Attack On CM Mamta Banerjee: ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल?

| Updated on: Mar 11, 2021 | 8:53 AM

सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या एका पायाला प्लॅस्टर करण्यात आल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. | Attack On CM Mamta Banerjee

Attack On CM Mamta Banerjee: ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल?
आता बंगालच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banejree) यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी आता तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने या हल्ल्याची दखल घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांच्याकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे. (Attack On CM Mamta Banerjee TMC will complaint to election commission)

सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या एका पायाला प्लॅस्टर करण्यात आल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. त्यामुळे आता बंगालच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

अभिषेक बॅनर्जींचा भाजपला इशारा

ममता यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममतांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने तयार रहावे. रविवारी 2 मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा,” असं म्हटलं आहे. 2 मे रोजी बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल असून मतपेटीमधून बंगालचे लोकं भाजपाविरुद्धचा राग व्यक्त करतील असे, अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.

भाजपकडून सीबीआय चौकशीची मागणी

भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ता शमिक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची एक चौकशी समिती नेमण्यात यावी. कारण मुख्यमंत्र्यांची सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यावेळी पोलीस कर्मचारी का उपस्थित नव्हते? पोलीस दलातील अधिकारीही त्यावेळी का हजर नव्हते? याचा उच्चस्तरीय तपास होणं गरजेचं असल्याचं भट्टाचार्य यांनी म्हटलंय.

ममता बॅनर्जींवर हल्ला नेमका कसा झाला?

ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पायाला दुखापत, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

West Bengal Election 2021 : ‘स्वत:चं नाव विसरु शकते, पण नंदीग्राम नाही, विजय निश्चित’ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममतांचा दावा

(Attack On CM Mamta Banerjee TMC will complaint to election commission)