West Bengal Election 2021 : ‘स्वत:चं नाव विसरु शकते, पण नंदीग्राम नाही, विजय निश्चित’ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममतांचा दावा

| Updated on: Mar 10, 2021 | 5:09 PM

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

West Bengal Election 2021 : स्वत:चं नाव विसरु शकते, पण नंदीग्राम नाही, विजय निश्चित उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममतांचा दावा
Follow us on

नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभेचं रणशिंग आता फुंकलं गेलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आपणच विजयी होणार, असा दावा त्यांनी केला आहे.(Mamata Banerjee files nomination from Nandigram assembly constituency)

“स्वत:चं नाव विसरु शकेन, पण नंदीग्रामला विसरु शकत नाही. नंदीग्रामची जनता मलाच मत देतील आणि त्यांचा विजय होईल. भवानीपूर माझं घर आहे. तिथे कुठलीही अडचण येणार नाही. एक दिवसाचा वेळ दिला तरी पुरेसा आहे. प्रत्येक कमिटी, प्रत्येक क्लब, हिंदू-मुस्लिम सर्वांचं प्रेम मिळत आहे. नंदीग्राम माझ्यासाठी नवा मतदारसंघ नाही. मी नंदीग्राम आंदोलनाला साथ दिली. तसंच शेतकरी आंदोलनासाठी 26 दिवसं धरणं दिलं”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना दिली आहे.

ममतांचं हिंदू कार्ड, भाजपला धक्का!

ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर मुस्लिम मतं जास्त असल्यामुळे नंदिग्रामची निवड केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी त्या नंदिग्राममध्ये पोहोचल्या. त्यावेळी ममता मुस्लिमांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण झालं उलटंच! त्यांनी सर्व शक्यतांना फोल ठरवत हिंदू कार्ड बाहेर काढलं.

नंदिग्रामच्या बरतला इथं मतदारांना संबोधित करताना ममता म्हणाल्या की, ‘मी एक हिंदू आहे. जे लोक 70 आणि 30 टक्क्यांचं कार्ड खेळत आहेत, त्यांनी सावध राहावं’. ममता यांनी व्यासपीठावरुन चंडी पाठसह अनेक मंत्रोच्चार केले. बराच वेळ त्या मंत्रोच्चार करत राहिल्या. आपण महाशिवरात्र नंदिग्राममध्ये साजरी करुन मगच जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्याचबरोबर बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी नंदीग्राममधील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

नंदीग्रामवासियांना चहाचं वाटप

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचं अजून एक रुप पाहायला मिळालं. शहरातील एका चहाच्या दुकानावर ममता बॅनर्जी यांनी थेट चहाची किटलीच हातात घेतली आणि सर्वांना चहा वाटला. ममता यांचं हे रुप पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

संबंधित बातम्या : 

West Bengal Election 2021 : निवडणुकीचा फिव्हर; ममता बॅनर्जींचा 3 मंदिरांचा दौरा, दर्ग्यावर चादर चढवली, चहाही वाटला!

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींना बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदार भाजपात

Mamata Banerjee files nomination from Nandigram assembly constituency