मनोरंजन सृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री खासदार होणार? पोटनिवडणुकीआधीच कमळ हाती घेतलं

मनोरंजन सृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री खासदार होणार आहे. या पोटनिवडणुकीआधीच अभिनेत्रीने कमळ हाती घेतलं आहे.

मनोरंजन सृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री खासदार होणार? पोटनिवडणुकीआधीच कमळ हाती घेतलं
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 2:40 PM

पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने उमेदवार म्हणून या जागेसाठी कोयल मलिक यांच्या मोठी घोषणा केली. त्यांनी राज्यसभेची उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खरंतर त्यांनी काही आठवड्यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांनी जवळपास 16 जुलै 2026 रोजी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. आता या जागेवर 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

बंगाली अभिनेत्री कोयल मलिक यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचं खरं नाव हे रुक्मिणी मलिक असे आहे. भाजपने रविवारी त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज सोमवारी कोलकातामधील भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. कोयल मलिक ही प्रसिद्ध अभिनेता रंजीत मलिक यांची मुलगी आहे. राजकारणात येण्याआधी त्यांनी सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. कोयल यांनी एप्रिल महिन्यात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली होती. परंतु त्यांनी अवघ्या काही दिवसांत राजीनामा दिला.

Loading...

कोयल मलिक यांनी 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी संसदेच्या कोणत्याही अधिवेशनात सहभाग घेण्याआधीच त्यांनी 16 जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्यांनी केवळ 10 दिवसच तृणमूल काँग्रेसची खासदार म्हणून राज्यसभेत कार्य केलं. परंतु तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.  कोयल मलिक यांचं भाजमध्ये स्वागत करताना पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पक्ष प्रवेश केल्यानंतर कोयल या राज्यसभेसाठी अर्ज करणार आहेत. खरंतर टीएमीसीच्या अनेक राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिलाय. यात सुष्मिता देव, सुखेंदू शेखर, प्रकाश चिक यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तराखंड आणि पश्चिम बंगालच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. भाजपने अभिनेत्री कोयल यांना उमेदवारी जाहीर केली. उत्तर प्रदेशच्या राज्यसभेच्या 10 तर उत्तराखंड आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी एक-एक जागांवर निवडणूक होणार आहे.  या जागेसाठी मतदान 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us