ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये काहीच चांगलं केलं नाही? राज्यपाल धनखड म्हणतात….

| Updated on: Jan 30, 2021 | 1:12 PM

टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांनी राज्यपाल धनखड यांना ममतांनी बंगालमध्ये काहीच चांगलं केलं नाही का? असा सवाल केला. West Bengol Governor Jagdeep Dhankhad On CM mamata banerjee

ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये काहीच चांगलं केलं नाही? राज्यपाल धनखड म्हणतात....
mamata Banerjee And Governor Dhankhad
Follow us on

चेन्नई : टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट बंगाल थिंक्स टूडे’ कार्यक्रमात प. बंगालचे राज्यपाल जयदीप धनखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध राज्यपाल धनखड अशी चर्चा देशभर रंगलीय. ममतांच्या एकाही निर्णयावर टीका करायची, मत व्यक्त करण्याची संधी राज्यपाल सोडत नाही. त्याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांनी धनखड यांना ममतांनी बंगालमध्ये काहीच चांगलं केलं नाही का? असा सवाल केला. त्यावर राज्यपाल धनखड म्हणाले, ‘मी बांग्ला विश्व केंद्रात गेलो. तिथं खूप चांगल्या पायाभूत सुविधा उभ्या केल्यात. बंगालच्या सडकांबद्दलही असंच म्हणता येईल. मी ममता बॅनर्जींना फोन केला. त्यांच्याकडे या कामांचं कौतुक केलं पण मी त्यांना बंगालमध्ये बिझनेस समिटचं काय झालं, केंद्रानं शेतकऱ्यांना जे पैसे पाठवले ते का नाही मिळाले असं विचारलं त्यावेळेस त्याचं उत्तर मला मिळत नाही…” (West Bengol Governor Jagdeep Dhankhad On CM mamata banerjee In Tv9 Network Conclave)

West bengol Conclave Tv9 Network

जय श्रीरामच्या नाऱ्यावर वाद का?

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पराक्रम दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी एका व्यासपीठावर होते. ममता बॅनर्जी जशाही बोलायला उठल्या तसं काही भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामची नारेबाजी सुरु केली. ममतांनी भाषण न करताच नाराजी व्यक्त करत मोदींसमोर अपमान झाल्याची भावना व्यक्त केली. राज्यपाल धनखड यांना त्याच बद्दल कार्यक्रमात विचारलं तर ते म्हणाले, “संविधानात म्हणजेच भारतीय राज्य घटनेतच राम, सीता, लक्ष्मण आहेत. त्यामुळे प्रत्येक मुद्याचं राजकारण व्हायला नको. पण मी फक्त लक्ष ठेऊन होतो, असं सांगायलाही राज्यपाल धनखड विसरले नाहीत.

बंगालमध्ये आणीबाणीची स्थिती?

बंगालमध्ये राजकीय हिंसा नवी नाही. पण आताची हिंसा ही टीएमसी विरुद्ध भाजपा कार्यकर्ते अशी होताना दिसतीय. राज्यपाल धनखड यांना त्याबद्दलही प्रश्न विचारले गेले. त्यावर ते म्हणाले, बंगालमध्ये आणीबाणीसदृश्य स्थिती आहे. सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. ज्या बंगालनं जगाला वाट दाखवली तिथं अशी स्थिती आहे. एकही निवडणूक विना हिंसेची होत नाही… पंचायतीची निवडणूक असो की गेल्या लोकसभेची. जो काही फैसला होईल तो मतदान यंत्रातून व्हावा. गांधींजींना हिंसा सोडायला सांगितली होती. आजचा दिवस त्यासाठी महत्वाचा आहे.

राज्यपाल भवन आता भाजपाचं कार्यालय झालंय?

राज्यपाल धनखड यांनी ममता सरकारच्याविरोधात जी भूमिका घेतलीय त्याबद्दल त्यांना विचारलं तर ते म्हणाले की, राज्यपाल भवनात मला भेटण्यासाठी सर्वात जास्त लोक डावे आणि काँग्रेसचे येतात. मी त्या सर्वांना भेटतो. राज्यपाल भवन सर्वांसाठी आहे. पण टीएमसीचे कुणीही नेते कधी भेटायला येत नाहीत. एका प्रश्नाच्या उत्तरात धनखड यांनी आवर्जून सांगितलं की, बंगाल विधानसभेचं सत्र हे राज्यपालांच्या अभिभाषणाशिवाय सुरु झालं.

(West Bengol Governor Jagdeep Dhankhad On CM mamata banerjee In Tv9 Network Conclave)

हे ही वाचा :

‘राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही’, स्मृती इराणी भडकल्या

मोठी बातमी: दिल्लीच्या व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल