राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितलेल्या कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा? वाचा सविस्तर

कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिल्याची माहिती राष्ट्रपतींनी दिली. (Ramnathk Kovind Kusum Scheme)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितलेल्या कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा? वाचा सविस्तर
रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानानं सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणामध्ये कुसुम योजेनेविषयी माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कुसुम योजनेचा देशातील शेतकऱ्यांना कसा लाभ होतोय, हे सांगतिलं. सिंचनासाठी वीज जोडणी न मिळाल्यानं होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपतींनी दिली. (President Ramnath Kovind mention Kusum Scheme in Presidential Address know about scheme )

कुसुम योजनेची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती. भारतातील मोसमी पाऊस, वीजेची कमतरता, जलसिंचन सुविधांच्या कमतरतांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं कुसुम योजना आणली होती. कमी पावसामुळे आणि वीज नसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. शेतकरी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर उर्जेचे पॅनेल आणि पंप लावून शेतीला पाणी देता येणार आहे.

या योजनेतून कशी कमाई करणार?

कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात.यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रीड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.एखाद्या शेतकऱ्याकडे पडीक जमीन असल्यास तो कुसुम योजनेच्या मदतीनं सौर उर्जा उत्पादनात चांगली कमाई करु शकतो. केंद्र सरकार पहिल्या टप्प्यात 27.5 लाख सोलर पंप मोफत देत आहे.

कुसुम योजनेची वैशिष्ट्ये

1. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. 2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल. 3. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देतील. 4. सौर उर्जा प्लाँट पडीक जमीनवर लावता येईल.

संबंधित बातम्या: 

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच कृषी कायदे, प्रजासत्ताक दिनाला जे झालं ते दुर्दैवी: रामनाथ कोविंद

कृषी कायद्यांवर विरोधक आक्रमक, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार

(President Ramnath Kovind mention Kusum Scheme in Presidential Address know about scheme )

Published On - 2:29 pm, Fri, 29 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI