भारतमाता आणि देवाची आठवण…धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रातील नेमके मुद्दे काय?

धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या पत्रात नेमके मुद्दे काय आहेत, जाणून घेऊयात.

भारतमाता आणि देवाची आठवण...धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रातील नेमके मुद्दे काय?
| Updated on: Jul 25, 2026 | 3:30 PM

मोदी सरकारला 12 वर्षात पहिला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमधील पहिल्या कॅबिनेटपदाच्या मंत्र्याने पहिल्यांदा राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. नीट पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतल्यानं मोदी सरकारला झुकावं लागलं आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या रोषामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देत पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर भारतमाता आणि देवाची आठवण करत धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रात काय मुददे आहेत, जाणून घेऊयात.

 

प्रधान यांच्या पत्रात नेमकं मुद्दे काय? 

गेल्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक जंतरमंतरवर ठाण मांडून बसले होते. मागील एका महिन्यापासून अभिजीत दीपके यांच्यासहित शेकडो विद्यार्थी आंदोलन करत होते. कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी संसद मार्च काढला होता. या मोर्चावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक आंदोलक जखमी झाले होते. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे सर्वत्र पडसाद उमटले होते. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आणखी आक्रमक भूमिका घेतली होती. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी अनेक मुद्दे अधोरेखित केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यात म्हटलं की, ‘मी देशाच्या तरुणांच्या भावना, रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारताची तरुण पिढीची स्वप्ने साकार करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिली आहे. पंतप्रधानांनी नेतृत्वाची संधी दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेत अनियमितता आढळलीये. या प्रकरणाची सरकारने तात्काळ दखल घेतलीये. तपास सीबीआयकडे सोपवलाय. ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर परीक्षेचे पुनर्नियोजन करण्यात आले. पुढील वर्षांपासून सीबीटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या काळात 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा पाडणे आमचं प्राधान्य होते. या परीक्षेचे पुनर्नियोजन 21 जून 2026 रोजी परीक्षा यशस्वीरित्या पार पडली’.

‘परीक्षा माफियांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ न देणे, कोणत्याही विद्यार्थ्यांवर होऊ न देण्याचा दृढनिश्चिय होता. आता 16 जुलैचा नीट-युजीचा निकाल हा समानधारक आहे. मी तरुणांच्या ध्येयांविषयी मनापासून आदर बाळगतो. तरुण हे विकसित भारताचे शिल्पकार आहेत. गेल्या 10 दिवसांपासून घटनांमुळे दु:ख झालं. माझ्यासाठी वैयक्तिक प्रश्न नाही. मी देशातील तरुणांना गोंधळाच्या दृष्टचक्रात अडकू देणार नाही. भारतातील एकाही विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकता कामा नये. तरुणांनी करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रीत करावं. मी माझा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले.

मी पंतप्रधान यांचे सतत पांठिब्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझे मंत्रिमंडळातील सहकारी, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली,त्यांचे आभार मानतो. भगवान श्री जगन्नाथजींच्या आशीर्वादाने मी भारतमातेच्या, ओडिशाच्या जनतेच्या आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही सर्वतोपरी स्वत:ला समर्पित करत राहीन, असेही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us