AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!

Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!

| Updated on: Jul 25, 2026 | 3:24 PM
Share

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “उशिरा का होईना, पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच. माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. उशिरा का होईना, पण न्याय मिळाला.”

पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचं कौतुक करत म्हटलं, “ही युवा पिढी आहे आणि त्यांनी आपल्या हक्कासाठी अत्यंत खंबीरपणे लढा दिला. या तरुणांचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांनी हा लढा जिंकला आहे.”

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, धमक्याही देण्यात आल्या. मात्र, या कोणत्याही दबावाला न जुमानता विद्यार्थ्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला. ज्या जिद्दीने आणि धैर्याने ही मुलं लढली, त्याचं खरंच कौतुक वाटतं. या युवा पिढीचा मला मनापासून अभिमान आहे.”

Published on: Jul 25, 2026 03:24 PM

Follow Us