AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली पुढच्या राजकारणाची दिशा!

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याचे म्हटले जात आहे. याच राजीनाम्यावर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली पुढच्या राजकारणाची दिशा!
sharad pawar and dharmendra pradhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 3:52 PM
Share

Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताच विरोधकांकडून कॉकरोच जनता पार्टीचे म्हणजेच सीजेपीचे अभिनंदन केले जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून सीजेपीचे दिल्लीच्या जंतर-मंतरच्या मैदानावर आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीमुळे झालेल्या घोटाळ्यासाठी धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी सीजेपीची होती. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत मोठं वजन असलेल्या खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या  प्रतिक्रियेत वापरलेल्या एका वाक्यात भविष्यात देशाचे राजकारण कसे असेल, याची प्रचिती येत असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे, अशी स्तुती शरद पवार यांनी केली.

शेवटी देशातील लोकशाहीने कात टाकली

तसेच, हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे, असं म्हणत विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. शेवटी देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, असं विधानही पवार यांनी केलंय.

फडणवीस, शिंदे दिल्लला रवाना होणार

दरम्यान, दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे नरेंद्र मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याचे म्हटले जात आहे. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनाही चांगला वेग आला आहे. प्रधान यांचा राजीनामा झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील रात्री दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच