American soldier : युद्ध सुरू असताना अमेरिकेचे सैनिक नेमकं काय खातात? तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाहीत

सध्या अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की अमेरिकन सैनिक युद्ध काळात नेमकं काय खातात? तुम्ही त्याबद्दल कधी विचारही करू शकणार नाहीत.

American soldier : युद्ध सुरू असताना अमेरिकेचे सैनिक नेमकं काय खातात? तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाहीत
American soldiers
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 8:42 PM

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यांमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेचे देखील अनेक सैनिक मारले गेले आहेत. आता अनेकांच्या मनात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे की, अमेरिकन सैनिक युद्ध सुरू असताना नेमकं काय खातात? युद्ध काळात त्यांचा आहार नेमका कसा असतो? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. अमेरिकन सैनिकांना दररोज प्रचंड मेहनत करावी लागते, तसेच त्यांचं ट्रेनिंग देखील खूप कडक असतं. त्यामुळे त्यांना खूप जास्त एनर्जीची गरज भासते. ही ऊर्जेची गरज भागवण्यासाठी त्यांच्या डायटचं नियोजन हे काटेकोरपणे केलेलं असतं. त्यांना दररोज कमीत कमी 3000 ते 4700 कॅलरी एवढी ऊर्जा मिळेल अशा पद्धतीने त्यांच्या आहाराचं नियोज केलेलं असतं.

युद्ध सुरू आहे की नाही, युद्ध सुरू असेल तर युद्धभूमीवरील वातावरण कसं आहे? हे लक्षात घेऊन त्यांचा डायट प्लॅन बनवला जातो. अमेरिकन सैन्याला सामान्य परिस्थितीमध्ये एक दिवसामध्ये तीन वेळा जेवणं दिलं जातं, ज्यामध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या गोष्टींचा समावेश असतो. अमेरिकन सैनिकांना नाष्ट्यामध्ये संत्रीचं ज्यूस, ओटमील, उकडलेली अंडी, ब्रेड आणि जाम, तसेच कॉफी या सारख्या गोष्टी दिल्या जातात. तर दुपारच्या जेवणामध्ये टोमॅटो किंवा चिकण सूप, बेक्ड चिकन आणि भात, हिरवे वटाने आणि ब्रेड या गोष्टी दिल्या जातात. कधीकधी त्यांना केक किंवा एखादा गोड पदार्थ देखील दिला जातो.

तर रात्रीच्या जेवणात मटण, कॉर्न बीफ, पोर्क चॉप्स, बटाटे, पास्ता, आणि वेगवेगळ्या फळांचे सलाद दिले जातात. या आहारामध्ये एखाद्या मिठाईचा देखील समावेश असतो. या पदार्थामधून त्यांना मोठ्या प्रमाणात ऊर्जेसोबतच आर्यनचा देखील पुरवठा होतो. तसेच अमेरिकन सैनिक जेव्हा युद्ध भूमीवर असतात तेव्हा त्यांना MRE म्हणजेच ‘Meal Ready-to-Eat’ पदार्थ दिले जातात. त्यांना भोजनासाठी असे पदार्थ दिले जातात, ज्यांना कुठल्याही प्रक्रियेची म्हणजे उकडण्याची, भाजण्याची अशी गरज नसते. ज्यामध्ये पीनट बटर, चीज स्प्रेड बटर, मिठाई, कँडी आणि वेगवेगळ्या ड्रिंक पावडर यांचा समावेश असतो. तसेच कच्चे फळ आणि भरपूर प्रमाणात पाणी दिलं जातं, त्यामुळे त्यांची ऊर्जा कायम टिकून राहते.

 

Follow Us