
Pakistan On Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराबाबत देशभरातील उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी यात्रा काढल्या जात आहेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी लोक उत्सूक आहेत. पण भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधील लोक राम मंदिराच्या उभारणीवर नाराज असल्याचे दिसत आहे. महिला YouTuber सना अमजद यांनी पाकिस्तानच्या लोकांची यावर प्रतिक्रिया घेतली. अनेकांनी राम मंदिरावर आक्षेप घेतला.
पाकिस्तानी लोकं राम मंदिराच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. राम मंदिराला त्यांचा विरोध होता. बाबरी मशीद पाडल्याने त्यांचा आक्रोश दिसून येत होता. त्याच ठिकाणी मंदिर बांधले जात असल्याने हा मुस्लिमांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न असल्याचं अनेकांचं मत होतं.
राम मंदिराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याबाबत काही लोकांचं मत होतं. भारतात लोकशाही दिसत नसल्याचं काही लोकांनी म्हटलं. पाकिस्तानातील नेत्यांनी ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करावे असे ते म्हणत होते.
यूट्यूबरने त्यानंतर पाकिस्तानातील लोकांची फिरकी घेतली. ती म्हणाली की, बाबरी मशिदीच्या जागेवर पूर्वी मंदिर होते. हे त्यांनी सिद्ध केले आहे. पाकिस्तानात किती हिंदू मंदिरे होती. ती मंदिरे पाडण्यात आली. याबाबत कोणी बोलत नाही.
पाकिस्तान हिंदू राइट्स मूव्हमेंटच्या माहितीनुसार 1947 मध्ये पाकिस्तानत 428 हिंदूंची मंदिरे होती. 1990 च्या दशकात 408 मंदिरे तोडण्यात आली. त्या मंदिरांच्या जागी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सरकारी शाळा किंवा मदरशे बनवण्यात आली.
अयोध्येत उभारले जात असलेले राम मंदिर हे देशातील आता आणखा एक मोठे धार्मिक केंद्र बनणार आहे. रामजन्मभूमी मंदिरात दररोज हजारो लोकं दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. आगामी काळात अयोध्या व्यावसायाच्या दृष्टीकोनातून देखील एक मोठे केंद्र बनणार आहे. ज्याचा फायदा येथील स्थानिक लोकांना होणार आहे. सोबत लाखो लोकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत.