
मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. खरे तर ब्रिटीशांनी आपल्या देशावर राज्य करताना त्यांचा कारभार सुरळीत चालण्याासठी अनेक सुविधा सुरु केल्या होत्या. त्यात मुंबईत 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ( मुंबई-सीएसएमटी ) ते ठाणे अशी आशियातील पहिली रेल्वे गाडी सुरु केली. मुंबईतील जडणघडणीत अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने या स्थानकांना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यातील काही नावे उच्चारायला अवघड आहेत. त्यामुळे त्या परिसराच्या नावाने संबंधित स्थानकांना नावे देण्यात यावीत असे पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. त्यानूसार आता मुंबईतील स्थानकांची इंग्रजी नावे जाऊन त्यांना आता मराठीत नावे देण्यात येणार आहेत. या स्थानकांना का अशी नावे का पडली, आता नावे बदलण्याने काय फायदा होणार ? रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते ? याची संपूर्ण माहीती पाहूयात… ...