
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेला हल्ला परतवून लावत भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांचे मोठे नुकसान केले. दुसरीकडे सीमेवर सुरु असलेल्या गोळीबारास जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची विनंती करण्यात आली. या सर्व घडामोडी दरम्यान पाकिस्तान व्याप्त काश्मीरची चर्चा पुन्हा सुरु झाली. सर्व भारतीयांच्या मनात पीओकेचा समावेश भारतात कधी होणार? हा प्रश्न आहे. गेल्या दहा दिवसांत तीन वेळा मोदी सरकारकडून पीओकेचा उल्लेख करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पीओकेमधूनच भारतात समावेशाची मागणी येणार असल्याचे म्हटले आहे. पीओकेमधील रहिवाशी स्वत: भारताचा भाग बनवण्याचा दावा करतील. त्यानंतर पीओके भारतात येईल. युद्धाद्वारे नाही तर चर्चेद्वारे पीओके भारतात येईल, पण असे होणार तरी कसे? जाऊन घेऊ या… देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असो किंवा विरोधी पक्षात कोणी असो,...