Sonali Phogat: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येचा उद्देश काय? दोन जणांच्या अटकेनंतरही अनेक प्रश्न

| Updated on: Aug 26, 2022 | 2:49 PM

या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी केली आहे. हरियाणातील एका नेत्यावरच आरोपींना मदत केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. गोव्यामधून हिसारमध्ये सोनाली यांचा मृतदेह आणून हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Sonali Phogat: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येचा उद्देश काय? दोन जणांच्या अटकेनंतरही अनेक प्रश्न
मृत्यूचे गूढ
Image Credit source: Instagram
Follow us on

हिसार– हरियाणाच्या भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर ही पावले उचलण्यात आली. या रिपोर्टनुसार सोनालीच्या शरिरावर दुखापतीच्या खुणा सापडलेल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही सोनालीसोबत 22 ऑगस्ट रोजी गोव्यात पोहचले होते. गोवा पोलिसांनी ही कारवाई करत, या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करुन या दोघांना अटक केली असली तरी सोनाली यांच्या शरिरावर धारदार शस्त्राने दुखापतीच्या खुणा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर पोस्टमार्टेमच्या रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट झालेले नाही. अशा स्थितीत सोनाली फोगाट यांचा मृत्यू नेमका का झाला, जर हत्या झाली तर त्याचे कारण काय आहे, असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.

गोव्यात संशयास्पद स्थितीत मृत्यू

सोनाली फोगाट या टिक टॉकवर व्हिडीओ टाकून चर्चेत राहिल्या होत्या. त्यांना 23 ऑगस्ट रोजी सकाळी मृतावस्थएत गोव्याच्या अंजुनामधील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. डॉक्टरांनी सुरुवातीला त्यांच्या मृत्यूचे कारण हार्ट अटॅक असल्याचे सांगितले होते. गुरुवारी सोनाली यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत सांगवान आणि वासी यांना अटक केली आहे. सोनाली यांचा भाऊ रिंकू यांनीही आपल्या तक्रारीत या दोघांवर संशय व्यक्त केला होता.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये शरिरावर वार

सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांच्या अनुमतीनंतर, सोनाली यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम गोव्यात मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आले. या अहवालानुसार, त्यांच्या शरिरावर वार केल्याच्या खुणा आहेत. मात्र याच खुणांमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम बुधवारीच करण्यात येणार होते, मात्र भाऊ रिंकू यांनी तिच्या दोन सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केल्याशिवाय पोस्टचमार्टेम करण्यास नकार दिला होता. तसेच या पोस्टमार्टेमचे व्हिडीओ शूटिंग करण्याची अटही टाकण्यात आली होती.

सोनाली यांची हत्या हा कट

सोनाली यांचे भाऊ रिंकू यांचा दवा आहे की, सोनाली य़ांचा पीए सुधीर आणि त्याचा मित्र सलुखविंदर यांनी आपल्या बहिणीच्या विरोधात कट रचून तिला त्यात अडकवले होते. तीन वर्षांपूर्वी सोनाली यांना मादक पदार्थ खाऊ घालून सुखविंदर याने सोनाली यांच्यावर बलात्कार केला होता. त्याचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले होते. त्यानंतर सुधीर आणि सुखविंदर सोनाली यांना सातत्याने ब्लॅकमेल करीत होते. हे दोघेही मधूनमधून सोनाली यांच्या जेवणात विषारी वस्तू टाकीत असत, त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली राहत नसे. अखेरीस या दोघांनीच कट रचून गोव्यात सोनाली यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

उच्चस्तरीय चौकशी होणार

या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी केली आहे. हरियाणातील एका नेत्यावरच आरोपींना मदत केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. गोव्यामधून हिसारमध्ये सोनाली यांचा मृतदेह आणून हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.