अतीक अहमद जसा होता तसा ‘धुरंधर’ मध्ये दाखवला तर वाईट काय ?- सीएम मोहन यादव

मध्य प्रदेशचे सीएम मोहन यादव यांनी 'धुरंधर-2' या चित्रपटातील अतिक अहमद याच्या केलेल्या चित्रीकरणाबद्दल बाजू घेतली आणि जो जसे वागत असेल त्याला तसे दाखवले तर काय वाईट आहे असाही सवाल केला.

अतीक अहमद जसा होता तसा ‘धुरंधर’ मध्ये दाखवला तर वाईट काय ?- सीएम मोहन यादव
CM MOHAN YADAV
| Updated on: Mar 24, 2026 | 10:08 PM

टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ या समिटची सर्वत्र चर्चा आहे. या समिटमध्ये कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक परिस्थिती आणि भारत या संदर्भातील आपले विचार मांडले. आज दुसऱ्या दिवसाच्या सत्रात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ‘धुरंधर-2’चित्रपटावर भाष्य करताना अतिक अहमद जसे करत होता तसेच धुरंधर चित्रपटात चित्रीत केले तर यात वाईट काय ? समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘धुरंधर-2’ या चित्रपटावर टीका केली आहे, त्याला उत्तर देताना मोहन यादव बोलत होते.

मोहन यादव म्हणाले की मी अजून ‘धुरंधर-2’ पाहिलेला नाही. परंतू जरुर पाहीन, अखिलेश यादव यांच्या टीकेवर ते म्हणाले की जर चित्रपट चांगला चालत असेल तर त्याला राजकीय अंगाने पाहणे चुकीचे आहे. जनता चित्रपट पाहात आहे. ज्यांना बोलायचे आहे ते बोलतील, मात्र ज्यांना पाहायचे आहे ते चित्रपट पाहातील.

आतिक अहमदला कसे सोडू शकतात ?

सीएम मोहन यादव यांनी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा उल्लेख करत सांगितले की काँग्रेसच्या शासनकाळात अतिरेकी हल्ला झाला. ते पाहात होते की अतिरेकी कोणाशी बोलत आहेत. ते पाकिस्तानशी बोलत होते. ते थेट पाकिस्तानशी संपर्कात होते.

मोहन यादव म्हणाले की त्यामुळे अशात अतिक अहमदला सूट कशी काय देऊ शकतो. जर अतिक अहमद जसा करत होता. तसेच धुरंधरमध्ये दाखवले असेल तर त्यात वाईट काय ?

कश्मीरातही थांबले अतिरेकी हल्ले

मोहन यादव म्हणाले की मोदी सरकार आल्यानंतर दिल्ली आणि मुंबई सोडा कश्मीरातील अतिरेकी हल्लेही थांबले आहेत. हल्ला करणाऱ्यांना दुसऱ्या देशात सोडत नाहीत. या बाबतीत अमेरिका आणि इस्राईल आणि भारत एक साथ उभे आहेत.

त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या टीका करताना राहुल गांधी पाकिस्तान आणि चीनचे कौतूक का करतात ? आपल्या देशाचे कौतूक करा. मात्र, ते याबाबतीत प्रश्न करतात त्यामुळे दु:ख होते.त्यांनी अशा या प्रकरणांपासून दूर राहिले पाहीजे.

Follow Us