ज्याला जन्मापासून मुलगी समजत होते, तो मुलगा निघाला, असा झाला चमत्कार

पालकांनी आपल्या बाळाच्या जन्मानंतर त्याच्या सर्व अवयवांची नीट काळजीपूर्वक तपासणी करावी. जर नजरेला काही विचित्र आणि असामान्य वाटत असेल तर त्वरीत विशेषतज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

ज्याला जन्मापासून मुलगी समजत होते, तो मुलगा निघाला, असा झाला चमत्कार
| Updated on: Nov 04, 2025 | 10:58 PM

दिल्लीच्या लेझर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत जटील असलेली आणि दुलर्भ मानली जाणारी लिंग विकाराचे ( जन्मजात जननेंद्रियाची विकृती ) यशस्वी ऑपरेशन केले करुन एक चमत्कार घडवून दाखवला आहे. या ऑपरेशनमुळे एका जन्मापासून एका मुलाला घरचे मुलगी समजत होते ,तो मुलगी नसून मुलगा असल्याचे उघडकीस आले आहे. ही जटील शस्रक्रिया दिल्लीच्या युपीएस हॉस्पिटलच्या सिनियर युरोलॉजिस्ट डॉ. गौतम बंगा आणि लेझर हॉस्पिटलचे संचालक तसेच सरगुजा संभागचे माजी युरोलॉजिस्ट डॉ.योगेंद्र सिंह गहरवार यांच्या संयुक्त टीमने केले आहे.

हे प्रकरण बलरामपूर जिल्ह्यातील ककना गावातील एका कुटुंबातील आहे. जे त्यांच्या ११ महिन्याच्या मुलाला जन्मापासून मुलगी मानत होते. कारण या मुलाचे बाहेरील गुप्तांग ( लिंग आणि अंडकोष ) दिसत नव्हते.

दिल्लीत लिंग विकाराचे सफल ऑपरेशन

हा मुलगा जसजसा मोठा होत गेला तसतशी कुटुंबातील लोकांची चिंता वाढत गेली. शेवटी त्यांनी आपल्या मुलाला घेऊन अंबिकापूर येथील लेझर हॉस्पिटल गाठले. जेथे तपासाअंती डॉ. योगेंद्र सिहं गहरवार यांनी रुग्णाचे अवयव मुलाचे असल्याचे ओळखले. जन्मजात विकृतीमुळे या मुलाचे लिंग शरीराच्या आत लपल्याचे स्पष्ट झाले.

त्यांनी मुलाची क्रोमोझोम तपासणी केली तेव्हा स्पष्ट झाले की हे जैविक रुपाने पुरुष जननेंद्रीय आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन किचकट असल्याने डॉ.गहरवार यांनी त्यांचे सहकारी तसेच दिल्लीचे प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ.गौतम बंगा यांनी खास बोलावून घेतले.

दोन्ही विशेष तज्ज्ञांच्या टीमने अडीच तास सुक्ष्म सर्जरीच्या माध्यमातून या मुलाचे यशस्वी ऑपरेशन केले. सर्जरीनंतर मुलगा संपूर्णपणे बरा असून सामान्य जीवनात परतत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अडीच हजार मुलात एकाला हा आजार होतो – डॉ. योगेंद्र गहरवार

ही एक अत्यंत दुर्लभ जन्मजात विकार असून तो अडीच हजार मुलांमध्ये एका मुला होतो. या विकारास हायपोस्पेडियस नावाने ओळखले जाते.या विकारात लिंग शरीराच्या त्वचा आणि पेशीय संरचनेत दबलेले असते जे बाहेरुन दिसून येत नाही. डॉक्टरांनी या विकारामागे अनेक कारणे असू शकतात. गर्भावस्था दरम्यान हार्मोन असंतुलन वा काही औषधांच्या सेवनाने देखील ही स्थिती उत्पन्न होऊ शकते.

वर्तमान काळात लेझर तंत्रज्ञान आणि उन्नत युरोलॉजीच्या माध्यमातून या प्रकारचे सर्व विकारांवर उपचार शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.