जीवनात RSS ची भूमिका आणि समाजातील योगदान, PM मोदी आणि Lex Fridman यांचा पॉडकास्ट लवकरच रिलीज होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली नसल्याचे नेहमी म्हटले जात असते. परंतू परदेशातील एआय रिसर्चर आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांना नरेंद्र मोदी यांनी तीन तासांची मुलाखत दिली आहे.

जीवनात RSS ची भूमिका आणि समाजातील योगदान, PM मोदी आणि Lex Fridman यांचा पॉडकास्ट लवकरच रिलीज होणार
| Updated on: Mar 16, 2025 | 3:44 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. तब्बल तीन तासांची ही मुलाखत एखाद्या परदेशी खाजगी माध्यमाला दिलेली पहिलीच मुलाखत आहे. या पॉडकास्टला आज सायंकाळी रिलीज केले जाणार आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरआरएसची त्यांच्या जीवनातील भूमिका आणि समाजातील आरएसएसचे योगदान यावर विस्ताराने भाष्य केले आहे.

पोस्ट येथे पाहा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन एआय रिसर्चर आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना मुलाखत दिलेली आहे. या प्रदीर्घ मुलाखती विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते आणि विरोधक दोघांनाही उत्सुकता लागलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील मोठा काळ आरएसएसमध्ये गेलेला आहे. त्याबद्दल पंतप्रधान या मुलाखतीत सविस्तर बोललेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शुक्रवारी या मुलाखतीबद्दल माहीती देत आपल्या जीवनातील महत्वाच्या चर्चापैकी ही एक चर्चात्मक मुलाखत आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहीलेय की , ‘ही एक रंजक मुलाखत होती. ज्यात माझ्या बालपणाचे किस्से आठवणी, हिमालयात मी घालवलेले दिवस आणि सार्वजनिक जीवनातील माझा काळ यावर चर्चा केलेली आहे.’

येथे पाहा पोस्ट –

पॉडकास्टमध्ये पीएम मोदी यांनी आरएसएसवर चर्चा केली

या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनातील वैयक्तिक बाबींचा उलगडा केलाच शिवाय आरएसएसचे सामाजिक योगदान आणि त्याचे संस्कार याविषयी देखील विस्ताराने चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर या पॉडकास्टला पाहण्यासाठी आणि या चर्चेचा एक भाग बनण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे.

“3 तासांचा शानदार पॉडकास्ट”

लेक्स फ्रिडमॅन यांनी देखील या पॉडकास्टची माहीती एका एक्स पोस्टद्वारे दिली आहे.त्यांनी लिहीलेय की “आपण नरेंद्र मोदी यांच्या सोबत एक शानदार 3 तासांच्या पॉडकास्टमध्ये बातचीत केली आहे. ही मुलाखत माझ्या जीवनातील सर्वात मोठ्या मुलाखतीपैकी एक आहे.”

पीएम मोदी यांचा पॉडकास्ट 5.30 वाजता रिलीज होणार

पीएम मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर या पॉडकास्टच्या रिलीज होण्याची वाट सर्वजण पाहात आहेत. हे पॉडकास्ट सायंकाळी 5.30 वाजता रिलीज केला जाणार आहे. या पॉडकास्टला आपण लेक्स फ्रिडमॅन आणि पीएम मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.