नागाला किती वर्षांचं आयुष्य मिळतं? एका सापाचं वय ऐकून थक्क व्हाल, माणसालाही टाकतो मागे!

जगातील सर्वाधिक आयुष्य जगणारा साप कोणता? बोआ कॉन्स्ट्रिक्टर साप किती वर्ष जगतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

नागाला किती वर्षांचं आयुष्य मिळतं? एका सापाचं वय ऐकून थक्क व्हाल, माणसालाही टाकतो मागे!
which snake lives the longest
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 11:41 PM

भारतामध्ये सापांबद्दल कायमच एक वेगळंच कुतूहल आणि भीती दोन्ही पाहायला मिळतं. आपल्याकडे सापांना नागदेवता मानून पूजा केली जाते, शिवाय महादेवाच्या गळ्यातला नागही आपल्या श्रद्धाेशी जोडलेला आहे. जगातही सापांवर आधारित अनेक रंजक कथा आणि रहस्यंसारख्या गोष्टी सांगितल्या जातात. पण घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात अचानक एखादा साप दिसला की मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि भंबेरी उडते! अर्थात, सध्या सोशल मीडियामुळे अनेक हुशार सर्पमित्र पुढे आले आहेत, जे अशा सापांना अगदी सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडतात आणि लोकांना सापांबद्दलची योग्य माहितीही देतात.

नक्की किती जगतात साप?

सापांच्या आयुर्मानाबद्दल बोलायचं झालं, तर प्रत्येक प्रजातीनुसार त्यांचं जगणं बदलत जातं. जगात काही साप अवघे काही महिने किंवा वर्षभर जगतात, तर काही मोजके साप माणसासारखंच वर्षानुवर्षे लांब आयुष्य काढतात. सापाचं वय हे प्रामुख्याने त्यांची जात, त्यांचा रोजचा आहार आणि त्यांच्या अनुवंशिक गुणधर्मांवर अवलंबून असतं.

Loading...

कोण आहे 40 वर्ष जगणारा हा महाकाय साप?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा साप तब्बल 40 वर्षांपर्यंत जगू शकतो. माणसाच्या आयुष्याशी तुलना केली, तर ही बाब आणखी थक्क करणारी आहे. कारण आजच्या काळात अनेकदा माणसांचं आयुष्यही 40 वर्षांपर्यंत पोहोचत नाही. गंभीर आजार, हृदयविकाराचा झटका किंवा अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे काही जणांचा मृत्यू चाळिशीच्या आधीच होतो. त्यामुळे निसर्गातील या सापाचं दीर्घायुष्य निश्चितच आश्चर्यचकित करणारं आहे.

जगात सर्वाधिक काळ जगणाऱ्या आणि आकाराने सर्वात लांब असणाऱ्या सापाचं नाव ‘बोआ कॉन्स्ट्रिक्टर’ असं आहे. विविध अहवालांनुसार, हा भल्यामोठ्या आकाराचा साप जर त्याच्या नैसर्गिक आणि एकदम पोषक वातावरणात राहिला, तर तब्बल 40 वर्षांपर्यंत जगू शकतो. सगळ्यात आश्चर्याची आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत आढळणारा हा अवाढव्य साप पूर्णपणे बिनविषारी असतो. त्यामुळे आकाराने मोठा असला तरी तो विषारी नसतो.

कोब्राचं आयुष्य किती असतं?

बोआ कॉन्स्ट्रिक्टरच्या खालोखाल जगात ओळखली जाणारी सर्वात प्रसिद्ध आणि डौलदार पण विषारी प्रजाती म्हणजे आपला कोब्रा नाग. एका चांगल्या वातावरणात या विषारी कोब्राचं आयुष्य साधारणपणे 25 ते 30 वर्षांपर्यंत असू शकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us