Suvendu Adhikari PA Death : पश्चिम बंगालच्या राजकारणातील हादरवणारी घटना, कोण होते चंद्रनाथ रथ? संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या PA ची निर्घृण हत्या

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. चंद्रनाथ रथ यांचं पार्थिव आज सकाळी पोस्टमार्टमसाठी बारासात रुग्णालयात आणण्यात आलं.

Suvendu Adhikari PA Death :  पश्चिम बंगालच्या राजकारणातील हादरवणारी घटना, कोण होते चंद्रनाथ रथ? संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या PA ची निर्घृण हत्या
chandranath rath
| Updated on: May 07, 2026 | 9:41 AM

संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. ते भाजपचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी यांचे पर्सनल असिस्टेंट पीए होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोनच दिवसात ही हत्या झाल्याने सर्वांनाच धक्का बसणं स्वाभाविक आहे. भररस्त्यात अत्यंत जवळून चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर या हत्येचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी या हत्येचा वेगाने तपास सुरु केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. चंद्रनाथ रथ यांचं पार्थिव आज सकाळी पोस्टमार्टमसाठी बारासात रुग्णालयात आणण्यात आलं.

सुवेंदू यांचे पीए चंद्रनाथ रथ आधी एअरफोर्समध्ये होते. एअरफोर्समधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम सुरु केलं. हळूहळू ते राजकीय समन्वयक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2019 साली सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी चंद्रनाथ रथ यांनी सुवेंदू यांच्यासोबत काम सुरु केलं. सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणे चंद्रनाथ रथ यांचं कुटुंब सुद्धा आधी तृणमुल काँग्रेसमध्ये होतं. त्यांची आई हसी रथ यांनी टीएमसीच्या कार्यकाळात पूर्व मेदिनापूरमधून स्थानिक पंचायत समितीवर पद भूषवलं आहे. पुढे सुवेंदू टीएमसी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर चंद्रनाथ रथ यांचं कुटुंब सुद्धा भाजपमध्ये सहभागी झालं.

कोर टीमचा भाग

जवळपास दोन दशकापासून चंद्रनाथ रथ सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत होते. या दरम्यान त्यांनी संघटनात्मक कामासह लॉजिस्टिक्सच व्यवस्थापन केलं. पार्टी कार्यकर्त्यांशी समन्वय राखला. सुवेंदू अधिकारी यांचे ते निकटवर्तीय, विश्वासपात्र होते असं भाजपमधील अंतर्गत सूत्र सांगतात. प्रचार व्यवस्थापन आणि राजकीय समन्वय या जबाबदाऱ्या ते पार पाडायचे. भाजपच्या भवानीपूर मोहिमेसह अनेक हाय-वोल्टेज राजकीय लढाईत ते सुवेंदू अधिकारी यांच्या कोर टीमचा भाग होते.

निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. काही ठिकाणी तृणमुल काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले झाले. दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांच्या हत्या सुद्धा झाल्या.

 

Follow Us