AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suvendu Adhikari PA Death : बंगालच्या राजकारणातील रक्तचरित्र, भररस्त्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराच्या PA ची निर्घृण हत्या, सुवेंदू अधिकारी बोलले की..

Suvendu Adhikari PA Death : सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या ही पश्चिम बंगालच्या राजकारणातही एक मोठी घटना आहे. सुवेंदू अधिकारी हे भाजपचे राज्यातील मुख्य नेते आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

Suvendu Adhikari PA Death : बंगालच्या राजकारणातील रक्तचरित्र, भररस्त्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराच्या PA ची निर्घृण हत्या, सुवेंदू अधिकारी बोलले की..
suvendu adhikari
| Updated on: May 07, 2026 | 12:34 PM
Share

सत्ता परिवर्तनानंतर पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित राजकारण अजून तीव्र होत चाललं आहे. काल भाजपचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भररस्त्यात अत्यंत निर्दयतेने हा खून करण्यात आला. पश्चिम बंगालच्या राजकारणात हिंसाचार अजिबात नवीन नाही. तिथे अनके वर्षांपासून निवडणुकी दरम्यान कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता उलथवून भाजपने या निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. काही ठिकाणी तृणमुल काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले झाले. दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांच्या हत्या सुद्धा झाल्या. पश्चिम बंगालच्या राजकारणातील हे रक्तचरित्र थांबलेलं नाही.

सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या ही पश्चिम बंगालच्या राजकारणातही एक मोठी घटना आहे. सुवेंदू अधिकारी हे भाजपचे राज्यातील मुख्य नेते आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मागच्यावेळी नंदीग्राममध्ये त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांनी भवानीपूरमध्ये येऊन पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना हरवलं. ते जायंट किलर ठरले. पश्चिम बंगालमध्ये अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरलेला नाही. पण सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. ते एक प्रमुख दावेदार आहेत. अशा नेत्याच्या जवळच्या माणसाचा रस्त्यात अशा प्रकारे खून होणं ही खूप मोठी बाब आहे.

ही मोठी राजकीय हत्या

सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेवर बोलताना ‘हा अत्यंत निदर्यतेने करण्यात आलेला खून’ असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात चंद्रनाथ रथ यांना संपवण्यात आलं. हल्ला करण्याआधी मारेकऱ्यांनी परिसराची रेकी केली होती असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. विधानसभा निवडणूक निकालानंतर 48 तासांच्या आत बंगालमध्ये ही मोठी राजकीय हत्या झाली आहे.

‘महा-जंगलराज’चा परिणाम

“पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला आहे. आम्ही दु:खात आहोत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. दिल्लीतील आमच्या नेतृत्वाने या घटनेची सगळी माहिती घेतली आहे. केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी चंद्रनाथ रथ यांचे कुटुंबिय आणि पोलिसांशी बोलले. अनेक नेते आणि नवनियुक्त आमदार इकडे आले आहेत. पोलिसांना काही पुरावे मिळाले आहेत. ते तपास करतील. हा 15 वर्षाच्या ‘महा-जंगलराज’चा परिणाम आहे. भाजप ही गुंडगिरी संपवण्याचं काम सुरु करेल. फक्त जरा वाट पाहा” असं सुवेंदू अधिकारी पीएच्या हत्येवर बोलताना म्हणाले.

Follow Us
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय