कधी अमेरिकेत बर्गर विकत होते, आज जगातील दुसरे सर्वाधिक पगार घेणारे CEO…भारतवंशी निकेश अरोरा यांचा पगार आहे तरी किती?

Who is Nikesh Arora?: जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या टॉप ५०० मध्ये भारतीय वंशाचे १७ जण आहेत. त्यामध्ये Adobe चे शंतनू नारायण अकराव्या क्रमांकावर आहे. त्यांना ४४.९३ दशलक्ष डॉलर पगार आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मल्होत्रा, ॲन्सिस अजेई गोपाल आणि व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्स रेश्मा केवलरामानी यांचीही नावे यामध्ये आहे.

कधी अमेरिकेत बर्गर विकत होते, आज जगातील दुसरे सर्वाधिक पगार घेणारे CEO...भारतवंशी निकेश अरोरा यांचा पगार आहे तरी किती?
nikesh arora
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:30 AM

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली म्हणजे जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे मुख्यालय आहे. या सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतवंशीय लोकांचा चांगला दबदबा आहे. काही मोठ्या कंपन्यांचे बॉसही भारतवंशी आहेत. त्यातील एक नाव आहे निकेश अरोरा. ते पालो अल्टो नेटवर्कचे सीईओ आहेत अन् जगात सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ आहेत. त्यांनी पगाराच्या बाबतीत मेटाचे प्रमुख मार्क जकरबर्ग, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही मागे टाकले आहे. त्यांचा पगार १,२६० कोटी रुपये (१५१.४३ दशलक्ष डॉलर) आहे.

सुंदर पिचाई, झुकेरबर्गपेक्षा जास्त पगार

वॉल स्ट्रीट जर्नलने 2023 मध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्यांची यादी जाहीर केली. त्यात पहिल्या क्रमांकावर ब्रॉडकॉमचे सीईओ हॉक टॅन आहेत. मलेशियन वंशाचे असलेले हॉक टॅन यांचा पगार 16.2 कोटी डॉलर (जवळपास 1,348 कोटी रुपये) आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मूळ भारतीय वंशाचे असलेले निकेश अरोरा आहे. त्यांचा १,२६० कोटी रुपये पगार आहे. अरोरा यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (२०३ कोटी रुपये) आणि गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई (सुमारे ७३ कोटी रुपये) यांनाही मागे टाकले आहे.

निकेश अरोरा कोण आहेत?

निकेश अरोरा उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. त्यांचा जन्म गाझियाबादमध्ये ९ फेब्रुवारी १९६८ रोजी येथे झाला. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात होते. त्यांनी १९८९ मध्ये आयआयटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर भारतात काही काळ त्यांनी विप्रोमध्ये केले. त्यानंतर ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए करण्यासाठी गेले. १९९२ मध्ये त्यांनी फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर फिडेलिटी टेक्नॉलॉजीजमध्ये आले. त्या ठिकाणी उपाध्यक्ष झाले. त्यांनी गुगलमध्ये काम केले. २०१४ मध्ये Google सोडले. जपानच्या सॉफ्टबँक कॉर्प, नंतर ते २०१८ मध्ये Palo Alto Networks मध्ये आले.

हे सुद्धा वाचा

शंतनू नारायण ११ व्या क्रमांकावर

जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या टॉप ५०० मध्ये भारतीय वंशाचे १७ जण आहेत. त्यामध्ये Adobe चे शंतनू नारायण अकराव्या क्रमांकावर आहे. त्यांना ४४.९३ दशलक्ष डॉलर पगार आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मल्होत्रा, ॲन्सिस अजेई गोपाल आणि व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्स रेश्मा केवलरामानी यांचीही नावे यामध्ये आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.