Abhijeet Dipke : बेस्ट Gen Z नेता कोण? अभिजीत दिपके यांनी क्षणाचाही विचार न करता कुणाचे घेतले नाव
Best Gen Z leader : देशात डिजिटल जमान्यात जेन झी पुढारी तयार झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर तर देशात अशा नेत्यांची एक लाटच उसळली आहे. सोशल मीडियाच नाही तर रस्त्यावरील लढाईत ही मंडळी अग्रेसर आहे. पण यातील बेस्ट जेन झी नेता कोण? अभिजीत दिपके यांनी दिले उत्तर

Abhijeet Dipke on Neha Bora: भारतात या मे महिन्यापासून राजकारणातही डिजिटल क्रांती आली आहे. डिजिटल पार्टीच्या माध्यमातून देशात मोठे आंदोलनच नाही तर नेतृत्वही उदयास आले. राजकीय पटलावर Gen Z चे नेतृत्व ठसठशीतपणे समोर आले. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत पक्षाने जे साध्य झाले नाही ते अवघ्या काही महिन्यांच्या कॉकरोच जनता पक्षाने करून दाखवले. अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास, नेहा बोरा आणि अजून अनेक नवीन चेहरे सामाजिक आणि राजकीय भूमिका प्रखरपणे, पोटतिडकीने मांडताना दिसत आहेत. पण यातील बेस्ट जेन झी नेता कोणता? अभिजीत दिपके यांनी याचे उत्तर दिले आहे.
जेन झी नेत्यांची क्रेझ
तरुणाईत जेन झी नेत्यांची क्रेझ आहे. त्यांची डिजिटल भाषा, त्यांचा विरोधाचे वेगळे तंत्र, अवघ्या काही मिनिटात देशातील लाखो तरुणांपर्यंत आवाज पोहचवण्याची इंटरनेटची ताकद, विविध आयुध, रॅपसाँग यामुळे प्रस्थापितांची मोठी त्रेधात्रिपीट उडल्याचे दिसून आले. जंतरमंतरवरील आंदोलनाचे लोण देशभर पोहचताच केंद्र सरकारने तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. यादरम्यान विविध जेन झी नेत्यांची चर्चा सुरू झाली. अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांना ऐकायला तरूणाई बाहेर पडली. इतकेच नाही तर महिला नेतृत्वही ठसठशीत पणे दिल्लीत समोर आले. नेहा बोरा हा डाव्या चळवळीचा चेहराही त्यापैकी एक आहे. तिच्या अभ्यासू भाषणाने तरुणाईला खिळवून ठेवले. सोशल मीडियावर जेन झी पैकी चांगले नेतृत्व गुण कुणाकडे आहे. कोण हिरारीने भूमिका मांडतो याविषयीची चर्चा रंगली. तेव्हा त्यावर अभिजीत दिपके यांनी सुद्धा तत्परतेने जेन झी नेता कोण याचं उत्तर दिले.
नेहा बोरा या प्रभावी जेन झी नेत्या
अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. नेहा बोरा ही आपल्यापेक्षा अधिक चांगली आणि प्रभावी जेन झी नेता असल्याचे त्याने चटदिशी सांगितले. त्याने कोणताही संकोच अथवा इगो दाखवला नाही. नेहा बोरा या तरुणाईची नाडी ओळखण्यात आणि त्यांच्यावर छाप टाकण्यात आपल्यापेक्षा सरस असल्याचे अभिजीत यांनी मंजूर केले. त्यांचा जेन झीमधील प्रभाव अधिक मोठा असल्याचे अभिजीत मानतात. राजकारणात एरव्ही आपणच कसे मोठे हे दाखवण्याची कोण स्पर्धा लागलेली असताना अभिजीत दिपके यांच्या या भूमिकेचे तरुणाईने स्वागत केले आहे. स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची धडपड करणाऱ्या नेत्यांना ही चपराक असल्याचे अनेकजण म्हणत आहेत. अभिजीत दिपके यांनी कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
