स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण

सध्याच्या जमान्यामध्ये शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या पालकाच्या आयुष्यातील स्कूल बस हा अविभाज्य घटक बनला आहे. कारण अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना आपल्या मुलांना शाळेत स्वत: सोडता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते स्कूल बसवरच अवलंबून असतात.

स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण
स्कूल बसचा रंगा पिवळाच का असतो?
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 29, 2025 | 9:01 PM

सध्याची जीवनशैली ही खूप व्यस्त आहे. जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर मग विचारायलाच नको. अनेकदा आई-वडील दोघेही नोकरी करत असतील तर त्यांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, आपल्या पाल्याला ते स्वत: शाळेत सोडायला जाऊ शकत नाहीत, अशावेळी त्यांना स्कूल बस हाच खूप मोठा आधार असतो. स्कूल बस मुलांना आपल्या घरातून शाळेत सोडण्याचं काम करते आणि पुन्हा  शाळेतून घरी आणण्याचं काम करते. मुलांसाठी एक सुरक्षित प्रवासाचं साधन म्हणून स्कूल बसकडे पाहिलं जातं. मुलाला शाळेत जाण्यासाठी स्कूल बस लावल्यास पालकांची देखील मोठी चिंता दूर होते, आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी शाळेत जाण्याचं टेन्शन राहतं नाही.  मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का की स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो?

स्कूल बसचा रंग पिवळा का असतो? या मागे देखील एक खास विज्ञान आहे. कारण पिवळ्या रंगांची  वेव्हलेंथ ही खूप जास्त असते, ती लाल रंगापेक्षा जास्त असते. त्यामुळे पिवळा कलर हा खूर दूरवरून देखील स्पष्ट दिसतो, त्यामुळे अनेक ठिकाणी धोका दाखवण्यासाठी पिवळ्या कलरचा वापर करतात. दरम्यान स्कूल बसमध्ये लहान मुलं असतात. ते शाळेत सुरक्षितरित्या पोहोचवण्याची जबाबदारी  चालकावर असते.  त्यामुळे रस्त्यात कुठे अपघात होऊ नये, समोरच्या व्यक्तीला स्कूल बस स्पष्ट दिसावी यासाठी देखील स्कूल बसचा रंग हा पिवळा असतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पिवळा कलर हा सामान्य झाला असून, तो स्कूल बसची ओळख बनला आहे. वाहनाचा पिवळा रंग बघताच ही स्कूल बस आहे, हे लगेचच समोरच्या चालकाच्या लक्षात येते. अशा परिस्थितीमध्ये त्याने वाहनाचा वेग कमी करणं अपेक्षित असतं.  त्यामुळे स्कूल बसचा प्रवास हा सुरक्षित होतो. त्यामुळे स्कूल बसचा रंग हा नेहमी पिवळाच असतो. पिवळा रंग हा लांबून देखील ठळक दिसतो, त्यामुळे सर्व स्कूल बस या शक्यतो पिवळ्या रंगाच्या असतात.