जगभरातील महिलांना का हवेत याच देशातील स्पर्म डोनर? निर्यातीचे सर्व विक्रम मोडले, एक जण तर 197 मुलांचा बाप

जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, जो देश सर्वात जास्त स्पर्मची विक्री करत आहे, त्याने स्पर्म निर्यातीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जगातील सर्व महिला याच देशातील स्पर्म डोनरची मागणी करत आहेत.

जगभरातील महिलांना का हवेत याच देशातील स्पर्म डोनर? निर्यातीचे सर्व विक्रम मोडले, एक जण तर 197 मुलांचा बाप
sperm
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 05, 2026 | 8:06 PM

जगातील सर्वात सुंदर आणि शांत देशामध्ये समावेश असलेला डेन्मार्क सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. डेन्मार्कमध्ये जन्मलेल्या 100 मुलांपैकी एक मुलं हे स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलेलं आहे. डेन्मार्क हा जगात सर्वाधिक स्पर्म डोनेशन करणारा देश बनला आहे. मात्र आता या इंडस्ट्रीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. डेन्मार्क सध्या अनेक देशांना स्पर्मचं डोनेशन करत आहे. जगभरातील महिला स्पर्मसाठी डेन्मार्कमधील निळ्या आणि गोऱ्या तसेच उंच शरीरानं तंदुरुस्त असलेल्या डोनरच्या शोधात असतात. याच कारणामुळे आता डेन्मार्क हा जगातील सर्वात जास्त स्पर्म डोनेट करणारा देश बनला आहे. डेन्मार्कचं मोठं आर्थकरण सध्या या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की डेन्मार्कचा एक व्यक्ती तर तब्बल 197 मुलांचा बाप बनला आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने 197 मुलांना जन्म दिला त्याच्यामध्ये कॅन्सरचा म्यूटेशन आढळून आला.

तपासणीमध्ये या व्यक्तीच्या पेशींमध्ये कॅन्सरचा म्यूटेशन आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. या व्यक्तीच्या स्पर्ममुळे ज्या मुलांचा जन्म झाला, त्यातील अनेकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या व्यक्तीचे स्पर्म जवळपास जगातील 14 देशांमधील महिलांनी खरेदी केले होते.

या व्यक्तीने 2005 मध्ये स्पर्म डोनेशनला सुरुवात केली होती. तो तब्बल 17 वर्ष स्पर्म डोनेशन करत होता. मात्र त्यानंतर तपासणीत त्याच्या पेशींमध्ये कॅन्सरचा म्यूटेशन आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली, त्याच्या स्पर्ममुळे ज्या बाळांचा जन्म झाला त्यातील अनेकांच्या पेशींमध्ये जन्मजात कॅन्सरचा म्यूटेशन आढळून आला, यातील अनेकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. डेन्मार्क नंतर युरोपमधून देखील मोठ्या प्रमाणात स्पर्म डोनेट होत असून ही इंडस्ट्री आता 1.3 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. डेन्मार्कमधून जगभरात सध्या स्पर्म निर्यात होत आहेत. जगभरातील महिला डेन्मार्कमध्ये जन्मलेल्या पुरुषांच्या स्पर्मसाठीच आग्रही आहेत, त्यामुळे निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युरोपातून देखील मोठ्या प्रमाणात निर्णात होत आहे.