AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला शिवलिंगला हात का लावू दिला नाही? लॉरेन पॉवेल यांच्या गुरुंनी उघडला राज

laurene powell in mahakumbh: निरंजनी अखाडे प्रमुख असलेले स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी सांगितले की, लॉरेन महाकुंभात असणार आहे. महाकुंभ कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा, अशी प्रार्थना त्यांनीही केली. गुलाबी रंगाचा सूट आणि डोक्यावर पांढरा दुपट्टा त्यांनी परिधान केला होता.

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला शिवलिंगला हात का लावू दिला नाही? लॉरेन पॉवेल यांच्या गुरुंनी उघडला राज
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 13, 2025 | 7:14 PM
Share

laurene powell in mahakumbh: अ‍ॅप्पलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल सध्या भारतात आहे. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी त्या आल्या आहेत. महाकुंभात येणे आणि भारत भ्रमणामुळे त्या सध्या बातम्यांमधून चर्चेत आहे. त्यांच्या या धार्मिक यात्रेत त्या काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या. बाबा भोलेनाथचे दर्शन घेतले. परंतु त्यांनी शिवलिंगला हात लावू दिला नाही. जगातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या लॉरेन पॉवेल यांना शिवलिंगला स्पर्श करण्याची परवानगी का दिली नाही? त्याचा खुलासा लॉरेन पॉवेल यांचे गुरु स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी केला आहे.

काय आहे कारण?

स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी सांगितले की, लॉरेन पॉवेल यांनी काशी विश्वनाथ मंदिरात भगवान महादेवचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिराच्या परंपरेचे पालन करत नियमानुसार दर्शन घेतले. नियमानुसार त्यांना शिवलिंगला हात लावण्याची परवानगी दिली नाही. कारण गैरहिंदू व्यक्तीला शिवलिंगला स्पर्श करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी बाहेरुनच दर्शन केले. मी एक आचार्य आहे. धार्मिक परंपरांचे पालन करणे हे माझे काम आहे. लॉरेन माझी मुलगी आहे. त्या आमच्या परंपरा समजून घेतात.

बाहेरुच केली पूजा

निरंजनी अखाडे प्रमुख असलेले स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी सांगितले की, लॉरेन महाकुंभात असणार आहे. महाकुंभ कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा, अशी प्रार्थना त्यांनीही केली. गुलाबी रंगाचा सूट आणि डोक्यावर पांढरा दुपट्टा त्यांनी परिधान केला होता. काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात त्यांनी बाहेरुच पूजा केली.

लॉरेन यांचे नाव बदलून कमला करण्यात आले आहे. त्या महाकुंभात सहभागी होत आहे. या काळात त्या एका संन्यासाप्रमाणे राहणार आहे. त्या कुंभमेळाव्यात गंगा नदीत स्नान करणार आहे. महाकुंभात 40 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. महाकुंभास सुरुवात १३ जानेवारीपासून झाली. सोमवारी महाकुंभाचे पहिले स्नान झाले. त्यानंतर १४ जानेवारी दुसरे स्नान होणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...