
PM Modi in Tejas | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धक्का तंत्रासाठी ओळखले जातात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना असाच एक धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तेजस’ या स्वदेशी बनावटीच्या फायटर जेटमधून उड्डाणाचा आनंद घेतला. तेजस मधून उड्डाण करुन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. “आज मी अभिमानाने सांगू शकतो की, आपली मेहनत आणि कष्ट यामुळे आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात जगात आपण कोणापेक्षाही मागे नाही” पंतप्रधान मोदींचे हे शब्द खूप काही सांगणारे, आत्मविश्वास वाढवणारे आहेत. तेजस हे DRDO आणि HAL हिंदुस्थान एरॉनॉटिक्सने मिळून विकसित केलेलं फाय़टर विमान आहे. आज भारताचाही फायटर विमान बनवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये समावेश होतो. एखाद फायटर जेट बनवण सोप नाहीय. कारण बरीच नवीन टेक्नोलॉजी, वायरिंग त्यामध्ये असते. भारतीय वैज्ञानिकांनी आपल्या मेहनतीने हे सिद्ध करुन दाखवलय. त्यामुळे मोदींना भारताच्या या यशाच अभिमान, स्वाभिमान वाटण स्वाभाविक आहे.
‘तेजस’ हे चौथ्या पिढीच फायटर विमान आहे. फोरथ जनरेशन प्लेन म्हटलं जातं. आज इंडियन एअर फोर्सकडे राफेल, सुखोई MKI 30 सारखी फायटर विमान आहेत, जी तेजसपेक्षा जास्त Advance समजली जातात. भारतातील अन्य राजकीय नेत्यांनी सुखोई, राफेलमधून आकाश भ्रमंतीचा आनंद घेतलाय. मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल, सुखोई MKI 30 सारखी फायटर विमान असतानाही तेजसचीच निवड का केली? हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तेजस हे आत्मनिर्भर भारताच प्रतीक आहे. हे आपण स्वबळावर विकसित केलेलं फायटर जेट आहे, तेच राफेल फ्रान्स आणि सुखोई रशियाकडून विकत घेतलेलं फायटर विमान आहे. त्यात आपण जी टेक्नोलॉजी विकसित केलीय, त्याचा प्रचार, प्रसार होण गरजेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या प्रत्येक भाषणात आत्मनिर्भर भारत, स्वेदशी करणारव जोर देत असतात. आज त्यांच्या तेजस उड्डाणामागे सुद्धा हाच उद्देश आहे.
Successfully completed a sortie on the Tejas. The experience was incredibly enriching, significantly bolstering my confidence in our country’s indigenous capabilities, and leaving me with a renewed sense of pride and optimism about our national potential. pic.twitter.com/4aO6Wf9XYO
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023
तेजसवर अनेक देश प्रभावित
HAL आता तेजस मार्क 1 ची निर्मिती करत आहे. हे तेजस पुढच व्हर्जन आहे. त्यामध्ये अधिक अत्याधुनिक शस्त्रास्र असतील. तेजस फायटर जेटही जगातल्या काही देशांना प्रभावित केलय. यात मलेशिया, अर्जेंटिनासारखे देश आहेत. भविष्यातील ते तेजस संभाव्य खरेदीदार असू शकतात. तेजसमध्ये आपण जितक्या सुधारणा करु तितकी त्याची एक्सपोर्ट व्हॅल्यू वाढणार आहे. परिणामी परकीय चलन आपल्याकडे येईल. तेजस हे एक हलक आणि अन्य फायटर जेटच्या तुलनेत स्वस्तात बसणार विमान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजसमधून जे उड्डाण केलं, त्याचे फायदे भविष्यात दिसतील.