Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पायलट, ‘तेजस’मधून घेतली भरारी
PM Modi takes sortie on Tejas aircraft | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फायटेर प्लेन 'तेजस'मधून भरारी घेतली. यापूर्वी राष्ट्रपती राहिलेले डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू यांनी सुखोई विमानातून भरारी घेतली होती. पंतप्रधान म्हणून फायटर प्लेनमधून भरारी घेणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान बनले आहे.

नवी दिल्ली, दि. 25 नोव्हेंबर 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फायटर प्लेन ‘तेजस’मधून भरारी घेतली. कर्नाटकमधील बंगळूर येथील येलहंका एयरबेसमधून त्यांनी तेजस विमान उडवले. फायटेर प्लेनमधून उड्डन करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. तेजस हे भारताचे ‘मेक इन इंडिया’ फायटर जेट विमान आहे. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) केली आहे. तेजस हे सिंगल इंजिन असणार विमान आहे. तेजस विमानाच्या दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत.
LCA चे इंजिन भारतात बनणार
तेजसचे इंजिन आता भारतात तयार होणार आहे. LCA MARK 2 (तेजस एमके 2) आणि स्वदेशी एडवांस्ड मीडियम कॉम्बैट एयरक्राफ्ट (AMCA) पहिल्या दोन स्क्वॉड्रनचे इंजिन भारतात तयार होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत मल्टी-रोल फायटर जेटला मंजुरी दिली आहे. भारतीय संरक्षण दल आत्मनिर्भर करण्याकडे हे महत्वाचे पाऊल आहे. आतापर्यंत भारत संरक्षण साहित्य विदेशातून आयात करत होता. परंतु आता संरक्षण क्षेत्रात भारताने ‘मेक इन इंडिया’ला सुरुवात केली आहे.
Successfully completed a sortie on the Tejas. The experience was incredibly enriching, significantly bolstering my confidence in our country's indigenous capabilities, and leaving me with a renewed sense of pride and optimism about our national potential. pic.twitter.com/4aO6Wf9XYO
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023
आतापर्यंत कोणी भरली हवाई दलाच्या विमानातून भरारी
- संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी 17 जानेवारी 2018 रोजी सुखोई विमानातून उड्डान केले होते.
- केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मे 2016 मध्ये सुखोई-30 MKI विमानातून भरारी घेतली होती.
- भाजप खासदार राजीव प्रताप रूडी यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी सुखोई-30MKI मधून उड्डान केले होते.
- संरक्षण राज्यमंत्री म्हणून राव इंद्रजीत सिंह यांनी ऑगस्ट 2015 मध्ये सुखोई-30 विमानातून उड्डान केले होते.
- राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी 25 नोव्हेंबर 2009 रोजी सुखोई-30 MKI मधून भरारी घेतली होती.
- एपीजे अब्दुल कलाम 8 जून 2006 रोजी भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआईमधून 30 मिनिटे उड्डान केले होते. हवाईदलाच्या विमानातून उड्डान करणे ते पहिले राष्ट्रपती ठरले होते.
- एनडीए सरकारमध्ये संरक्षण मंत्री असताना जॉर्ज फर्नांडीस यांनी 22 जून 2003 पुणे येथील लोहगाव विमानतळावरुन SU-30 MKI विमानातून उड्डान केले होते.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानातून उड्डन केले होते.
