Akasa Air news: ज्यांचे हात पोळले आहेत, त्याच वाटेणे राकेश झुनझुनवालांचा प्रवास; ते म्हणतात मला लोकांना खोटं ठरवायचय…

| Updated on: Aug 05, 2022 | 9:22 PM

झुनझुनवाला सांगतात की, विमानसेवा त्यांच्यासाठी आता ही प्रतिष्ठेचा गोष्ट बनली आहे. त्यामुळे ते म्हणतात की, 'मला लोकांना आता चुकीचे सिद्ध करायचे आहे. त्यामुळे आता हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.

Akasa Air news: ज्यांचे हात पोळले आहेत, त्याच वाटेणे राकेश झुनझुनवालांचा प्रवास; ते म्हणतात मला लोकांना खोटं ठरवायचय...
Follow us on

मुंबईः जगावर मंदीच सावट असतानाच विमानात घालायचे इंधन म्हणजेच जेट फ्यूलच्या किंमतीने उच्छांक गाठला आहे, आणि विमानाच्या इंधनाच्या किंमती आता गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे विमान वाहतूकसारख्या उद्योगात यशस्वी होणे आता सोपे राहिले नाही. सुब्रत रॉय, नरेश गोयल आणि विजय माल्यारख्या (Vijay Mallya) लोकांचे हात या धंद्यात भाजून निघाले आहेत. तरीही अब्जाधिश असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) या धंद्यात का येत आहेत. त्यांची गुंतवणूक असलेली ‘आकासा एअर’ (Akasa Air) रविवारपासून ‘उड्डाण’ सुरू करत आहे. झुनझुनवाला हे स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांना भारताचे वॉरेन बफेटदेखील म्हटले जाते. त्यांची 30 हून अधिक कंपन्यांमध्ये भागीदारी आहे आणि 3.5 अब्ज संपत्ती आहे आणि ते भारतातील 52 क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात पण ते आता पहिल्यांदाच स्वतःची कंपनी सुरू करणार आहेत आणि तीही वयाच्या ६२ व्या वर्षी.

या क्षेत्रात अनेकांचे हात पोळून निघाले आहेत तरीही झुनझुनवाला या सेक्टरमध्ये जाण्याचा का विचार करत असतील असा सवाल आता अनेकांना पडत आहे.

मी अपयशासाठी तयार

राकेश झुनझुनवाला यांनी फेब्रुवारीमध्ये एक कार्यक्रम घेतला होता, त्यामध्ये ते म्हणाले होते की, मी विमानसेवा का सुरू केली आहे हा अनेकांना प्रश्न पडला असेल. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा मी अपयशासाठी तयार आहे असे सांगेन असं त्यांनी त्यावेळी वक्तव्य केले होते. प्रयत्न न करण्यापेक्षा प्रयत्न केल्यानंतर अपयशी होणे चांगले असते असंही त्यांनी सांगितले होते. झुनझुनवाला ज्या मार्गावर आहे, त्या मार्गावर अनेक दिग्गजांचे हात आधीच भाजले आहेत हे खरे आहे, याचे मोठे उदाहरण म्हणजे मद्य व्यावसायिक विजय माल्ल्या. त्यांची किंगफिशर एअरलाइन्स 2012 मध्ये दिवाळखोरीत निघाली आणि बँकांचे 1 अब्ज डॉलर्सही बुडाले. माल्ल्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा खटला सुरू असून तो सध्या यूकेमध्ये असून त्याला भारतात आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

अनेक दिग्गजांचे हात पोळले

सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांनीही विमानसेवा क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एअर सहारा सुरू केले. मात्र ते अनेक वर्षे तोट्यात राहिले म्हणून नंतर त्यांनी ते 2007 मध्ये नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजला विकून टाकले. 2019 मध्ये जेट एअरवेज बंद झाले. या मोठ्या पडझडीच्या काळात एअर सहारा करारच कारणीभूत असल्याचे मत अनेक व्यक्त करतात. तर देशातील तिसरी सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून स्पाइसजेटही संकटात सापडली आहे. त्यांच्या विमानांमध्ये एकामागून एक तांत्रिक बिघाड होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

भारत एक मोठी बाजारपेठ

हुरुन इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनस रहमान जुनैद यांच्या मतानुसार लोक म्हणतात की करोडपती होण्यासाठी तुम्ही आधी अब्जाधीश बनले पाहिजे आणि नंतर कंपनी सुरू केली पाहिजे. पण भारतातील प्रत्येक विमान कंपनी अपयशी ठरली आहे, असे नाही असंही ते आपलं मत व्यक्त करतात. भारतात जगातील इतर देशांपेक्षा सर्वात वेगात विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे. तर जगातील विमान वाहतूक क्षेत्रात सर्वात श्रीमंत लोक हे भारतातीलच आहेत असंही रहमान जुनैद सांगतात. राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया यांनी 2006 मध्ये इंडिगो सुरू केली होती ती आज देशातील सर्वात मोठी एअरलाईन म्हणून ओळखली जाते.

लोकांना खोटं ठरवायचं आहे…

झुनझुनवाला सांगतात की, विमानसेवा त्यांच्यासाठी आता ही प्रतिष्ठेचा गोष्ट बनली आहे. त्यामुळे ते म्हणतात की, ‘मला लोकांना आता चुकीचे सिद्ध करायचे आहे. त्यामुळे आता हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. झुनझुनवाला यांनी Akasa मध्ये 35 दशलक्ष रुपये गुंतवले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांचे मत आहे की, झुनझुनवाला हे स्मार्ट गुंतवणूकदार आहेत पण एअरलाइन चालवणे हे स्टॉक ट्रेडिंगसारखे नाही. तर झुनझुनवाला कंपनीचे दैनंदिन कामकाज व्यवस्थापन समितीकडे सोपवतील आणि त्यामध्ये अनेक उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश असेल असंही ते सांगतात.

कमी किमती सेवा देणार

आकासा स्वत:च्या उद्योगाकडे एक बदलता मोठा उद्योग म्हणून त्याच्याकडे बघते, इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत आपले भाडे 10 टक्के स्वस्त असणार असल्याचा आकासा दावा आहे. आकासा एअरने त्यांच्या व्यावसायिक उड्डाणांसाठी तिकीटांची विक्रीही सुरू केली आहे. कंपनीचे पहिले उड्डाण 7 ऑगस्टपासून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू होणार आहे. या दोन शहरांदरम्यान विमान कंपनी आठवड्यातून 28 उड्डाणे करणार आहे.त्यानंतर ही कंपनी 13 ऑगस्टपासून बेंगळुरू आणि कोची या दरम्यान दर आठवड्याला 28 उड्डाणे करणार. कंपनीने सुरुवातीच्या टप्प्यात अहमदाबाद, बंगळूरु, मुंबई आणि कोचीसाठी तिकीटांची विक्रीही सुरू केली आहे. शेअर बाजारात आपल्या नावाचा झेंडा रोवणाऱ्या झुनझुनवाला आता या क्षेत्रात किती यशस्वी होतील, हे येणारा काळच ठरवणार आहे.