कशी नशिबानं थट्टा आज मांडली… हे गाणं आठवल्यावर अमृता फडणवीसांना कुणाचा चेहरा आठवतो? आदर राखत मिसेस फडणविसांनी स्पष्टच सांगितलं

बस बाई बस या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस प्रमुख उपस्थिती होती. सुबोध भावेंनी त्यांना सवाल करण्याआधी त्यांना कशी नशीबानं थट्टा मांडली हे पिंजरा चित्रपटातील गाणं त्यांना ऐकवण्यात आले, आणि त्यांनी थेट नाव घेतलं ते ऐकून मात्र कार्यक्रमात हशा पिकाला...

कशी नशिबानं थट्टा आज मांडली... हे गाणं आठवल्यावर अमृता फडणवीसांना कुणाचा चेहरा आठवतो? आदर राखत मिसेस फडणविसांनी स्पष्टच सांगितलं
महादेव कांबळे

|

Aug 05, 2022 | 7:20 PM

मुंबईः केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्या चर्चा आल्या की ही दोन नावं नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीत प्रचंड वेगाने बदलत आहेत, त्यामुळे राज्याचे राजकारणही नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे, मात्र या सगळ्या चर्चेत एकाद्या मुद्याने चर्चेत येणारं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस (Amruta Fadnavis). राजकारणातील अनेक नेते आता देवेंद्र फडणवीस यांना गुरू मानतात, मात्र पण त्यांच्या नावाच्या चर्चेपेक्षा मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याच नावाची जोरदार चर्चा असते. आजही त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नावाभोवती चर्चा रेंगाळत ठेवली, कारण होतं सुबोध भावे (Subodh Bhave) होस्ट करत असलेला झी मराठीवरील बस बाई बस हा कार्यक्रम.

 

या कार्यक्रमामध्ये त्यांना सुबोध भावेंनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

‘बस बाई बस’ कार्यक्रमातील रंगत

बस बाई बस या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस प्रमुख उपस्थिती होती. सुबोध भावेंनी त्यांना सवाल करण्याआधी त्यांना कशी नशीबानं थट्टा मांडली हे पिंजरा चित्रपटातील गाणं त्यांना ऐकवण्यात आले. गाण्याच्या एक दोन ओळी ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, हे गाणं ऐकताच कोणाचा चेहरा समोर येतो असा प्रश्न त्यांनी विचारला असता, त्यांनी लगेच उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर त्यांनी हेही सांगितले की, मी उद्धव ठाकरे यांचा मानसन्मान ठेवते मात्र हे गाणं ऐकल्यानंतर मात्र मला उद्धव ठाकरे यांचाच चेहरा समोर येतो असंही त्यानी सांगितले.

थेट पक्षप्रमुखांचंच नाव

अशा बेधडक वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेताच त्या कार्यक्रमामध्ये हशा पिकाला. त्याच मुद्याला धरुन त्यांनी पुढे मंगळसूत्राविषयी सांगत त्यांनी मंगळसूत्र गळ्यात घालण्यापेक्षा हातात मंगळसूत्रा का घातले जाते त्यांची एक वेगळीच गोष्ट त्यांनी सांगितली.

सौभाग्याचं निशाण म्हणून मंगळसूत्र

या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी मंगळसूत्राविषयी सांगताना म्हणाल्या की, सौभाग्याचं निशाण म्हणून मंगळसूत्र आपण गळ्यात घालतो, पण तेच मंगळसूत्र मी गळ्यात न घालता हातात घालते कारण आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा त्याने आपला हात धरवा हा विचार त्यापाठीमागे आहे. असा विचार जेव्हापासून मी करते आहे तेव्हापासून मी हातात मंगळसूत्र घालायला लागले असंही त्यांनी यावेळी सांगितले. हातात मंगळसूत्र घातल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझा हात पकडला असल्याची भावनाही येते असं भावनिक होत गळ्यातील आणि हातातील मंगळसूत्राविषयी सांगितले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें