
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असतानाच आता काश्मीर खोऱ्यात एक अनपेक्षित आर्थिक परिणाम दिसून येत आहे. देशभरातील केशरच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून त्याने इतिहासातील उच्चांक गाठला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उच्च दर्जाच्या काश्मिरी केशरची किंमत प्रति किलो 5 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. अवघ्या दोन आठवड्यांत ही किंमत सुमारे 50 हजार ते 75 हजार रुपयांनी वाढली आहे. यामुळे केशर आता 50 ग्रॅम सोन्याइतकाच महाग झाला आहे. या वाढत्या किंमतीमुळे जागतिक व्यापारात त्याची वाढती कमतरता आणि अतुलनीय मूल्य अधोरेखित झालंय. एकीकडे भारतात सोन्याच्या किंमती गगनाला भिडत असतानाच आता केशर त्याहून महाग झालंय. यामागची नेमकं कारणं काय आहेत, पहलगाम हल्ल्याचा केशरच्या किंमतींशी काय संबंध आहे आणि या वाढत्या किंमतींचा काश्मीरला फायदा होणार की तोटा याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. केशरच्या किंमतीत...