Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर

Sugar Stock: ऐन सणासुदीच्या काळात साखर महाग झाल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे. साखरेचा पुरेसा साठा असूनही हे दर का वाढवे जात आहे आता यामागील कारण समोर आले आहे.

Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे... तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
| Updated on: Aug 25, 2026 | 10:31 AM

Sugar Crisis: ऐन सणासुदीच्या काळात साखर महाग झाल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच 40-50 रुपये किलो दराप्रमाणे साखर विकली जात होती, पण आता याच साखरेचा दर 100 रुपयांचा दर ओलांडेल की काय अशी भीती सर्वांच्याच मनात निर्माण झाली आहे, मात्र, देशात साखरेचा पुरेसा साठा असल्याची माहितीआता समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात साखरेचा दर वाढण्याऐवजी घसरणार असल्याचे म्हटले जात आहे. साखरेचा पुरेसा साठा असूनही हे दर का वाढवे जात आहे आता यामागील कारण समोर आले आहे.

साखरेच्या भाववाढी मागील योग्य कारण समोर

सणासुदीचा काळात पुरेल इतका साठा देशात उपलब्ध आहे. तरीही गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर तब्बल 40 टक्क्यांनी वाढून गगनाला भिडले. या अचानक झालेल्या दरवाढीमागे प्रत्यक्ष तुटवडा नसल्याचे कारणही समोर आले आहे. व्यापाऱ्यांची साठेबाजी आणि तुटवड्याच्या भीतीने ग्राहकांनी केलेली आगाऊ खरेदी या दरवाढीला कारणीभूत असल्याचा माहिती समोर आली आहे. ‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी हा दावा केला आहे.

जुलैमध्ये 48 रुपये किलो असलेली साखर ऑगस्ट महिन्यात थेट 55 ते 56 रुपयांवर पोहोचली. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीलाच देशात तब्बल साडेतीन महिने पुरेल इतका साखर साठा उपलब्ध होता. नेहमी गरजेनुसार खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी दीड ते दोन महिने पुरेल इतका साठा भरून ठेवला आहे. आता यामुळे साखरेचा भाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्पादनाचा विचार केल्यास देशात 279 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे, तर वार्षिक वापर 280 ते 285 लाख टन आहे. मागील वर्षाच्या (261 लाख टन) तुलनेत यंदाचे उत्पादन हे अधिकच झाले.  यंदा 30 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आली आहे. 8 लाख टन साखर निर्यात झाली आहे. साखरेचा साठा पुरेसा आहे त्यामुळे उगाचच नागरिकांनी घाबरु नये, असे आश्वासन आता ISMA यांनी दिले आहे.

Follow Us