Nimisha Priya Case : यमनमध्ये कोणत्या गुन्ह्यासाठी होते फाशी? काय आहेत कायदे? कुराणात काय लिहिलंय?

Nimisha Priya Case : केरळमधील नर्स निमिषा प्रियाला यमनी नागरिक तलाल अब्दो मेहंदीच्या हत्येप्रकरणी 16 जुलै रोजी फाशीची शिक्षा होणार आहे.

Nimisha Priya Case : यमनमध्ये कोणत्या गुन्ह्यासाठी होते फाशी? काय आहेत कायदे? कुराणात काय लिहिलंय?
Nimisha Priya
Image Credit source: Tv9 Telugu
| Updated on: Jul 10, 2025 | 5:37 PM

केरळमधील नर्स निमिषा प्रियाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. तिला यमनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. निमिषा प्रियाला कथितपणे यमनी नागरिक तलाल अब्दो मेहंदीच्या हत्येप्रकरणी 16 जुलै रोजी फासावर लटकवण्यात येणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी माहिती दिली होती. “आम्हाला यमनमधील निमिषा प्रियाच्या शिक्षेबाबत माहिती आहे. आम्हाला समजले आहे की प्रियाचे कुटुंब योग्य पर्यायांचा विचार करत आहे. सरकार या प्रकरणात सर्व शक्य ती मदत करत आहे” असे ते म्हणाले होते. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोल्लेनगोडे येथील 36 वर्षीय नर्स निमिषा प्रिया 2008 मध्ये आपल्या पालकांना आर्थिक मदत करण्यासाठी यमनला गेली होती. अनेक रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर तिने अखेरीस स्वतःचा दवाखाना सुरू केला होता. यमनच्या स्थानिक कायद्यांनुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत काम करणे आवश्यक असते. ती 2014 मध्ये तलाल अब्दो महदी याच्या संपर्कात आली होती. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा