
उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेरठमध्ये एक महिला आपल्या पतीला सोडून दिराबरोबर पळून गेली आहे. मौलानाच्या पत्नीला त्याची दाढी आवडत नव्हती. लग्न झाल्यानंतर तिने मौलानाला दाढी करण्यास सांगितलं, मात्र या मौलानानं दाढी काढण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या पत्नीनं मौलानाला म्हटलं की दाढी किंवा मी यापैकी तुम्हाला फक्त एकाची निवड करता येईल. पत्नीच्या या इशाऱ्यानंतर देखील मौलानानं आपली दाढी काढण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर मौलानाची पत्नी क्लीन शेव असलेल्या तिच्या दिरासोबत फरार झाली. घटनेच्या दोन महिन्यांनंतर ही महिला परत आपल्या पतीकडे आली. मात्र त्यानंतर त्याने तिला तलाक दिला. पोलीस स्टेशनच्या बाहेरच जोरदार राडा झाला.
मौलानाने काय केला आरोप?
मौलानाने म्हटलं आहे की, माझं आणि तिचं लग्न सात महिन्यांपूर्वी झालं होतं. पण तिला दाढीवाले लोक आवडत नव्हते, तिला दाढी टोचत होती. तिने मला दाढी काढण्यास सांगितलं, मात्र मी दाढी काढण्यास नकार दिला, त्यानंतर ती माझ्यासोबत सतत भाडंत होती. तीने या प्रकरणाची तक्रार तिच्या कुटुंबाकडे देखील केली होती, असा आरोप मौलानानं केला आहे.
या महिलेचं मौलाना सोबत लग्न झालं, मात्र तिला त्याची दाढी आवडत नसल्यामुळे ती या मौलानाच्या भावाबरोबर पळून गेली. त्यानंतर मौलानानं आपली पत्नी हरवली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती, मौलानाची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केली. ते दोघे पंजाबमधील लुधियानाला पळून गेले होते. पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा मेरठमध्ये आणलं. दोन महिन्यानंतर ही महिला आपल्या दिरासोबत घरी पोहोचली.
पोलीस ठाण्याबाहेर राडा
पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही कुटुंबात जोरदार राडा झाला, मी माझ्यापतीसोबत राहणार नाही असं या महिलेनं म्हटलं. त्यानंतर मौलानानं तिला पोलीस ठाण्याच्या गेटवरच तलाक दिला. या महिलेनं आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. माझा शारीरीक आणि मानसीक छळ केल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. तसेच मला धमकी देखील देत होता असंही या महिलेनं म्हटलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.