
एक महिलेने आपल्या डॉक्टर पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेचं म्हणणं आहे की, तिचा डॉक्टर पती नपुंसक आहे. तो शारीरिक संबंध ठेवण्यात असमर्थ आहे. मागच्या दीड वर्षांपासून पती माझ्यासोबत झोपत नाही. तो काहीतरी निमित्त शोधून दुसऱ्या खोलीत पळून जातो. महिलेने तिच्या डॉक्टर पतीवर आरोप लावून FIR नोंदवला आहे. महिलेनुसार, तिचं लग्न 25 एप्रिल 2024 रोजी झालेलं. लग्नानंतर पतीचं वागणं खूप विचित्र होतं. लग्नानंतर प्रत्येक वेळी तो वेगवेगळी कारणं शोधून दुसऱ्या खोलीत झोपायला जायचा. गोरखपूर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
वडिलांनी डॉक्टर मुलगा आहे म्हणून लग्न लावून दिलं होतं, असं महिलेचं म्हणणं आहे. हुंड्यामध्ये 15 लाख रुपये आणि किंमती सामना सुद्धा दिलं होतं. सासरची माणसं कारची मागणी करत होते, असा महिलेचा आरोप आहे. डॉक्टरच्या नपुंसकतेच्या आजाराबद्दल सांगितलं, तेव्हा सासरच्यांनी तिला मारहाण करुन घराबाहेर काढलं. सध्या महिलेच्या भावाने तक्रारीच्या आधारावर गोला पोलीस ठाण्यात पती आणि अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हुंड्यामध्ये त्याला 15 लाख रुपये दिले
महिलेचा पती गोरखपुरच्या खजनी क्षेत्रात पशुंचा डॉक्टर आहे. गोला पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या महिलेच्या भावाने तक्रार केली आहे. 25 एप्रिल 2024 रोजी त्याच्या बहिणीचं लग्न खजनी भागातील एका युवकाबरोबर झालं. हुंड्यामध्ये त्याला 15 लाख रुपये दिले होते. 26 एप्रिल रोजी बहिणीची पाठवणी झाली.
सुहागरातच्या दिवशी काय घडलेलं?
इतका हुंडा दिल्यानंतरही सासरचे खुश नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की, मुलगा डॉक्टर आहे. त्याला कमीत कमी कार मिळाली पाहिजे असं आरोपात म्हटलं आहे. त्यावरुन बहिणीला सासरी खूप सुनावलं जायचं. पण बहिणीने तिच्या पतीबद्दल जे सांगितलं, ते ऐकल्यानंतर आम्हाला मोठा धक्का बसला, असं महिलेच्या भावाने म्हटलं. सुहागरातच्या दिवशी सुद्धा डॉक्टर पती खोलीत आला नाही असा पत्नीचा आरोप आहे. सकाळी विचारल्यावर सांगितलं की, कुठल्यातरी केसच्या प्रकरणात ते बाहेर गेलेत. रोज रात्री तो खोलीत येणं टाळायचा. दुसऱ्या खोलीत जायचा किंवा छतावर जाऊन झोपायचा.
महिलेला मारहाण करुन घराबाहेर काढलं
महिलेने सांगितल की, डॉक्टर पतीच्या बॅगेत अनेक औषध असायची. दीड वर्षानंतर तिला समजलं की, डॉक्टर पती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असमर्थ आहे. या सर्व गोष्टी लपवून सासरच्यांनी लग्न लावून दिलं होतं. जेव्हा मी माहेरच्यांना या बद्दल सांगितलं, तेव्हा सासरच्यांना खूप राग आला. त्यांनी महिलेला मारहाण करुन घराबाहेर काढलं.