
बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, बांका जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेनं आपलं घरदार, मुलं बाळं आणि पतीला सोडून आपल्या भाच्यासोबत मंदिरामध्ये लग्न केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेनं आपल्याच पतीला आपल्या दुसऱ्या लग्नाचा एक फोटो देखील मोबाईलवर पाठवला आहे, त्या सोबतच मेसेजमध्ये असं काही लिहिलं ज्यामुळे या महिलेच्या पतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना बिहारमधील बांका जिल्ह्यातल्या अमरापूर गावची आहे, पुनम कुमारी असं या महिलेचं नाव आहे, 2014 मध्ये तिचं लग्न अमरापूरमध्ये राहणाऱ्या शिवम कुमार यांच्यासोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं देखील झाले, लग्न झाल्यानंतर काही वर्ष सर्व सुरळीत सुरू होतं, मात्र त्यानंतर त्या दोघांमध्ये सतत खटके उडू लागले. त्याला कारण देखील तसंच होतं, लग्नाच्या काही वर्षांनंतर शिवम कुमार हा कामात एवढा व्यस्त झाला की, हळहळू त्याची पत्नी त्याच्यापासून दूर गेली.
त्याच काळामध्ये पुनम आणि शिवम यांच्या घरी आणखी एका पाहुण्याची एन्ट्री झाली, त्याचं नाव होतं अंकित कुमार, अंकित हा पुनमचा दुरचा भाचा होता, त्यामुळे शिवम कुमार याला देखील अंकित आपल्या घरी येतो याचं काही विशेष वाटत नव्हतं. मात्र त्याला याची साधी भनक देखील लागली नाही की ते दोघे लग्न करणार आहेत. घरामध्ये अंकितच येण-जाण वाढलं, त्यामुळे पुनम आणि त्याच्यामधील जवळीक देखील वाढली. त्यानंतर एक दिवस असा आला की पुनम अचानक घरातून गायब झाली, पुनम कुठे गायब झाली याचा शिवमला काहीच थांगपत्ता नव्हता, त्याने शेजारी -पाजारी आपल्या नातेवाईकांकडे पुनमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पुनम अचानक गायब झाल्यानं तो चिंतेत होता.
त्यानंतर त्याला रात्री आठच्या सुमारास अचानक एक मेसेज आला, त्याला पुनमने एक फोटो पाठवला होता, ज्यामध्ये तिने आपला भाच्चा अंकित सोबत लग्न केलं होतं. तिने आपल्या पतीच्या मोबाईलवर एक मेसेज देखील पाठवला होता, त्यामध्ये तीने म्हटलं होतं की मी आता अंकितसोबत लग्न केलं आहे, त्यानंतर शिवमने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.