
हरिद्वारच्या हरकी पौडी भागात बुधवारी यात्रेकरूंना टिळा लावण्यावरून तीन महिलांमध्ये जोरदार वाद झाला. पाहता पाहता शाब्दीक वार हाणीमारीपर्यंत जाऊन पोहोचला. तिन्ही महिलांनी एकमेकींचे केस ओढले, कपडले फाडले, एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रस्त्यावरील लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
काय आहे व्हिडीओ?
हरकी पौडी येथील तीन महिलांमध्ये सुरु असलेला वाद पोलिसांपर्यंत पोहोचताच ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकीत आणले. चौकशीत समजले की तिन्ही महिला हरकी पौडी आणि आसपासच्या घाटांवर येणाऱ्या यात्रेकरूंना टिळा लावून पैसे मागण्याचे काम करतात. बुधवारी यात्रेकरूंना आधी टिळा लावण्यावरून त्यांच्यात परस्पर वाद झाला, नंतर त्याचे रुपांतर मारामारीत झाले.
श्रद्धालुओं को टीका लगाने की होड़ में हर महिलाओं ने पैड़ी को रणभूमि बना डाला। ऐसे कई मामले हरिद्वार में पहले भी आते रहे हैं, प्रशासन और गंगा सभा को हर की पैड़ी का प्रबंधन बेहतर बनाने के लिए काम करना चाहिए।#harkipaidi #haridwar #uttarakhand pic.twitter.com/Re1amFW1ZU
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) October 30, 2025
पोलिसांनी तिन्ही महिलांना दिली कठोर सूचना
पोलीस अधिकारी रितेश शाह यांनी सांगितले की तिन्ही महिलांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी त्यांना कठोर इशारा देत भविष्यात असे वर्तन न करण्याची सूचना दिली आहे. पोलिस कायद्याच्या कलम ८१ अंतर्गत चालान दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांनी महिलांना धार्मिक स्थळी किंवा भक्तांसोबत असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.
धार्मिक स्थळाची प्रतिष्ठा टिकवणे सर्वांची जबाबदारी – पोलिस
पोलिसांचे म्हणणे आहे की हरकी पौडीसारख्या संवेदनशील आणि धार्मिक महत्त्वाच्या स्थळाची प्रतिष्ठा टिकवणे सर्वांची जबाबदारी आहे. अशा प्रकरणांमध्ये भविष्यात कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. सध्या तिन्ही महिलांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. पोलिसांनी भागात बंदोबस्त वाढवला आहे जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही. उत्तराखंडचा हरिद्वार भाग भक्तांसोबतच पर्यटकांची पहिली पसंती आहे, येथे दररोज मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी येतात.