कोण आहेत एलीना मिश्रा-शिल्पी सोनी? त्यांची यशोगाथा PM मोदी यांनीच केली महिला दिनी शेअर, त्यांच्या कर्तृत्वा पुढे तर आकाशही ठेंगणे

Women Day 2025 Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी महिला दिनी एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांची छायाचित्र त्यांच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहेत. कोण आहेत या दोघी, यांचा आदर्श घ्यावा तरुणींनी...

कोण आहेत एलीना मिश्रा-शिल्पी सोनी? त्यांची यशोगाथा PM मोदी यांनीच केली महिला दिनी शेअर, त्यांच्या कर्तृत्वा पुढे तर आकाशही ठेंगणे
एलिना मिश्रा, शिल्पी सोनी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 08, 2025 | 12:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला दिवसाचे औचित्य साधून सोशल मीडियावर देशातील दोन सर्वात ख्यातनाम महिलांची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. त्यातील एक एलिना मिश्रा आहेत तर दुसर्‍या या शिल्पी सोनी आहेत. एलिना या अणुशास्त्रज्ञ आहेत. तर शिल्पी या अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. या दोघांच्या अथक प्रयत्नांची, त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी दखल घेतली आहे. त्यांचे कौतुकच नाही तर देशातील प्रगतीत त्यांच्या योगदानाचे महिला दिनानिमित्त आभार मानले आहेत. विज्ञान शाखेत भारतात मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात या दोन शास्त्रज्ञ अनेकांसाठी मूर्तिमंत उदाहरण असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

एलिना मिश्रांचे अथक प्रयत्नांची कहाणी

एलिना मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या X पोस्टवर प्रतिक्रिया दिली. “मी एलिना मिश्रा. मी ओडिशामधील भुवनेश्वर येथील आहे. माझ्या घरात शैक्षणिक वातावरण होते. विज्ञानाची कास धरण्यासाठी घरची परिस्थिती अत्यंत अनुकूल होती. माझे वडील हेच माझे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्यामुळे मला विज्ञानात गोडी वाढली. विज्ञानाविषयी रूची, उत्सुकता वाढली. मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्रासाठी माझी निवड झाल्यावर तर जणू मला पंख मिळाले. मोठं बळ मिळाले.” असे त्यांनी उत्तरादाखल पोस्टमध्ये म्हटले आहे. एलिना या सध्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, एक्सीलरेटर फिजिक्स आणि टेक्नॉलॉजी या प्रांतात मुशाफिरी करत आहेत. त्यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. या सर्व गोष्टी किचकट वाटत असल्या तरी त्यातून भविष्यात अनेकांचे जीवन सुखद आणि सुकर होणार असल्याचे सांगायला एलिना या विसरल्या नाहीत.

शिल्पी सोनी यांची भरारी

शिल्पी सोनी या मध्यप्रदेशातील सागर या शहरातील आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती साधारणच होती. पण घरातून त्यांना संशोधन, शिक्षण आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची मोठी शिदोरी मिळाली. त्या DRDO मध्ये रूज झाल्या. त्यांचे एक मोठे स्वप्न सत्यात उतरले. या ठिकाणी गेल्या 24 वर्षांपासून त्या इस्त्रोसाठी 35 हून अधिक विविध उपकरणं, संप्रेषण, नेव्हिगेशन मशिन यासाठीच्या उपकरणासंबंधीचे संशोधन करत आहेत. या उपकरणांची रचना, विकास आणि इतर कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

इस्त्रोत संशोधन, काम करण्यास मोठा वाव असल्याचे शिल्पी सांगतात. तुमचे समाधान होईपर्यंत तुम्ही संशोधनात गढून जाऊ शकता. या ठिकाणी शास्त्रज्ञांना संशोधनासाठी बळ मिळते. त्यांच्या कल्पनांना पंख मिळतात. तुम्ही या ठिकाणी मोठी झेप घेऊ शकता असे शिल्पी भरभरून बोलल्या.

अत्यंत कठीण, किचकट असलेल्या स्पेस ट्रॅव्हलिंग वेब युट्यबचे भारतीय मॉडेल तयार करण्याच्या कामात त्यांचे योगदान आहे. इस्त्रोने केलेले हा गुढ, अद्भूत कार्य अनेकांना हेवा वाटवं असं असल्याचे सांगतानाच अंतराळ तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेने भारताने घेतलेली ही गरुड भरारी असल्याचे शिल्पी सोनी कौतुकाने सांगतात.