Rahul Gandhi: महिला आरक्षण विधेयक तर लोकसभेत आपटलं, पण हे ’16 नंबर’ चं काय आहे कोडं? राहुल गांधी भाजपची डोकेदुखी वाढवणार?

Rahul Gandhi Magical 16 Number Puzzle: काल लोकसभेत अपेक्षेप्रमाणे नारी शक्ती वंदन अधिनियम पडले. केंद्र सरकारलाही गणित माहिती होते. पण यामागे भाजपची काय खेळी होती हे लवकरच समोर येईल. तर त्याचवेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणातून चिमटे काढता काढता 16 क्रमांकाचे कोडं टाकून एक खेळी खेळली आहे.

Rahul Gandhi: महिला आरक्षण विधेयक तर लोकसभेत आपटलं, पण हे 16 नंबर चं काय आहे कोडं? राहुल गांधी भाजपची डोकेदुखी वाढवणार?
राहुल गांधी, नरेंद्र मोदी, अमित शाह
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 18, 2026 | 10:08 AM

Rahul Gandhi 16 Number Puzzle: अपेक्षेप्रमाणे नारी शक्ती वंदन अधिनियम विरोधकांनी हाणून पाडले. 2023 मध्येच याविषयीचा कायदा मंजूर केला असताना पाच राज्यांच्या निवडणुकीच्या धामधुमीत हे विधेयक आणण्याच्या हेतूवर विरोधकांनी आक्षेप घेतला. शुक्रवारी लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर त्यांची बाजू मांडली. त्यांनी या वेळी जोरदार चिमटे काढले. त्यांच्या काही टिप्पणीमुळे लोकसभेत गदारोळ माजला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानांची माफी मागावी अशी आग्रही भूमिका घेतली. पण गदारोळात राहुल गांधी यांनी 16 क्रमांकाचे कोडं टाकून संपूर्ण देशालाच कोड्यात टाकले. त्यांची ही शा‍ब्दिक कोटी भाजपचं टेन्शन वाढवणार का, अशी जोरदार चर्चा सध्या देशात सुरू आहे. द विंची कोड सारखं हे 16 क्रमाकांचं गणित आहे तरी काय? असा सवाल विचारल्या जात आहे.

राहुल गांधींनी 16 नंबरचं कार्ड फेकलं

काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपला चिमटे काढले. त्यांच्या काही उपमा आणि टिप्पणीमुळे मोठा गदारोळ माजला. त्याचवेळी राहुल गांधी यांनी भाजपने हा महिला आरक्षणाचा डाव का टाकला याची माहिती लवकरच समोर येईल असे वक्तव्य केले. ते म्हणाले की पंतप्रधान हे भाषण करत असताना त्यात जोश दिसला नाही. त्यांची ऊर्जा कमी वाटत होती. हे भाषण सुरू असताना मी कॅलेंडरकडे, दिनदर्शिकेकडे पाहिले, त्यावऱ 16 एप्रिल ही तारीख होती. त्याचवेळी राहुल गांधी यांनी 16 नंबरचे कार्ड दाखवले. त्यांनी देशाला एक कोडं टाकलं. संभाषणाद्वारे ते म्हणाले की कोणी समजलं का की मला काय म्हणायचं आहे? ज्यांना मी काय म्हणालो हे समजलं असेल तर त्यांनी मला सोशल मीडियावरील खात्यावर प्रतिक्रिया द्यावी. त्यांनी मला संदेश पाठवावा. त्यामुळे राहुल गांधी नेमका काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्या कोड्यानं वाढवली उत्सुकता

राहुल गांधी यांच्या 16 क्रमांकाच्या या कार्डने, कोड्यानं सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे. राहुल गांधी यांना यातून काय सुचवायचंय आणि त्यांनी याच क्रमांकाचा का उल्लेख केला, यामागे काय रहस्य आहे, याची देशभरात चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्या या कोड्याकडे भाजपही साशंकतेने बघत आहे. भाजपमध्ये सुद्धा या विषयीचा चर्चा सुरू आहे. राहुल गांधी हे वेळेकडे, तारखेकडे संकेत करत आहेत की या 16 क्रमांकामागे काहीतरी वेगळेच गुपित आहे? याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. राहुल गांधी हे या मुद्दावरून देशात धुक्यांचं वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरले आहे. या गुत्थीत, कोड्यात दडलंय काय? व्हाय धीस कोलावरी डी या सूप साँगप्रमाणे या 16 नंबरची चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us