AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good news : नवरात्रोत्सवात महिलांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट, 40 लाख लाभार्थ्यांना थेट फायदा, बँकत जमा होणार वाढलेली रक्कम

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेलया लाडकी बहीण योजनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. याच धरतीवर अनेक राज्यांमध्ये देखील अशीच योजना सुरू करण्यात आली आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Good news : नवरात्रोत्सवात महिलांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट, 40 लाख लाभार्थ्यांना थेट फायदा, बँकत जमा होणार वाढलेली रक्कम
Orunodoi SchemeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 1:47 PM
Share

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. आसाममध्ये सुरू असलेली कल्याणकारी योजना ‘ओरुनोदोई’ या योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. ही वाढलेली रक्कम नवरात्रीपूर्वी महिलांच्या थेट खात्यामध्ये जमा होईल असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू आहे, त्याच धर्तीवर आसाममध्ये ‘ओरुनोदोई’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पूर्वी महिलांना 1,250 रुपये मिळत होते, परंतु त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली आहे.

त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी महिलांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ‘ओरुनोदोई’ योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांच्या खात्यात आता दीड हजार रुपये जमा होणार आहेत. याचा फायदा राज्यातील 40 लाख महिलांना होणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आसामच्या नारी शक्तीसाठी सरकारची मोठी भेट आहे. मी अशी प्रार्थना करतो की दुर्गा मातेचा आशीर्वाद सर्वांवर राहावा. ओरुनोदोई योजना ही एक सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. त्यांच्या बँक खात्यात 1,250 रुपये जमा करण्यात येतात. या पैशांचा उपयोग त्यांना घर खर्चासाठी होतो. परंतु आता सरकारने यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑक्टोबरपासून महिलांच्या बँक खात्यात वाढीव रकमेसह हाफ्ता जमा केला जाणार आहे.

काय आहे पात्रता?

महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेसाठी ज्या अटी आहेत, सर्वसामान्यपणे त्याच अटी ‘ओरुनोदोई’ या योजनेसाठी देखील ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेतील लाभार्थी महिला ही मुळ आसामची रहिवासी असावी, तिचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावं, कुटुंबाचं उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावं अशा काही अटी या योजनेसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

Follow Us
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण