असा शब्द जो लग्न न झालेल्या महिला कधीच बोलू शकत नाहीत, 99 टक्के लोकांना माहिती नसणार उत्तर

तुम्हाला आता नक्कीच असा प्रश्न पडला असेल की, असा कोणता शब्द आहे की जो फक्त विवाहित महिलाच बोलू शकते, अविवाहित महिला बोलू शकत नाही? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणू घेणार आहोत.

असा शब्द जो लग्न न झालेल्या महिला कधीच बोलू शकत नाहीत, 99 टक्के लोकांना माहिती नसणार उत्तर
marriage
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 23, 2026 | 3:29 PM

अनेकदा आपले आजी आजोबा किंवा आपले जवळचे नातेवाईक,  मित्र मंडळी सुद्धा आपल्याला काही कोडे विचारत असतात. त्यांनी देखील ते कुठेतरी ऐकलेलं असतं किंवा वाचलेलं असतं. त्या कोड्यामागे विशिष्ट लॉजिक असतं, ते लॉजिक आपल्याला सापडलं तर आपण सहज त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, मात्र जर आपल्याला लॉजिक लावता आलं नाही तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, अनेकदा सरकारी नोकरीसाठी मुलाखत घेताना देखील या स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात. क्विंचित प्रसंगी आता खासगी नोकरीमध्ये देखील लॉजिकच्या नावाखाली तुमची मुलाखत घेणारा जो व्यक्ती आहे, तो असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. असे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात

जेव्हा आपल्याला असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही काय लॉजिक लावता, हे तपासण्याचा समोरच्याचा उद्देश असतो, असे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात, जर आपण त्या प्रश्नाचं उत्तर कुठे वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर आपण लगेच ते उत्तर देतो. मात्र जर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर मग आपल्याला असे प्रश्न कोडयात टाकतात, अशा प्रश्नांमुळे आपला गोंधळ देखील उडण्याची शक्यता असते, अशावेळी आपण योग्य लॉजिक लावून विचारपूर्वक प्रश्नाचं उत्तर देणं समोरच्या व्यक्तीला अपेक्षित असतं.

आज आपण अशाच एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. हा प्रश्न देखील असाच काहीसा गोंधळात टाकणारा आहे. प्रश्न असा आहे की? असा कोणता शब्द आहे? तो फक्त विवाहित महिलाच बोलू शकतात, अविवाहित महिला बोलू शकत नाहीत. या प्रश्नामुळे नक्कीच तुमचा गोंधळ उडू शकतो, परंतु त्याचं उत्तर सोप आहे. त्याचं योग्य उत्तर आहे, सासुबाई . कारण कोणत्याही मुलीच्या आयुष्यात सासुचं नातं हे लग्न झाल्यानंतरच येतं. त्यामुळे कोणतीही मुलगी ऑफिशयली सासुबाई हा शब्द लग्नापूर्वी म्हणू शकत नाही, एखादी तरुणी किंवा महिला लग्नापूर्वी आपल्या प्रियकराच्या आईचा उल्लेख सासुबाई असा करू शकते, परंतु लग्न झाल्यानंतरच त्या नात्याला अधिकृत मान्यता मिळते.