170 खोल्यांचा जगातील सर्वात मोठा महल; येथे राहतात केवळ 5 लोक! या पॅलेसची सुंदर महाराणी कोण?

World Biggest Palace in India : तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात मोठ्या घराची मालकीण कोण आहे ते? या सुंदर आणि भव्य महालाची मालकीणही अतिसुंदर आहे. ती उच्चशिक्षीत आहे. 170 खोल्या असलेल्या या महलात केवळ 5 लोक राहतात.

170 खोल्यांचा जगातील सर्वात मोठा महल; येथे राहतात केवळ 5 लोक! या पॅलेसची सुंदर महाराणी कोण?
| Updated on: Oct 28, 2025 | 4:48 PM

Princess Radhikaraje Gaikwad : भारतात अनेक बडी राजघराणी होती. त्यात अनेकांची महल ही आजही पाहण्यासारखी आहेत. या आलिशान वाड्यांमध्ये एक मोठं गाव राहू शकेल इतकी जागा आहेत. तर तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात मोठ्या घराची मालकीण कोण आहे ते? या सुंदर आणि भव्य महालाची मालकीणही अतिसुंदर आहे. ती उच्चशिक्षीत आहे. 170 खोल्या असलेल्या या महलात केवळ 5 लोक राहतात.

लक्ष्मी विलास पॅलेस

जगातील सर्वात मोठे घर हे भारतात आहे. हा सध्या जगातील सर्वात मोठे खासगी महल आहे. हे जगातील सर्वात मोठे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. या घराला लक्ष्मी विलास पॅलेस असे म्हटले जाते. हे घर भारतासह जगभरातील लोकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. लक्ष्मी विलास पॅलेस एकदम आलिशान घर आहे. या राजमहलासमोर तर ब्रिटनच्या राजाचे घर बकिंघम पॅलेस सुद्धा फिक्के आहे. या पॅलेसची किंमत 24,000 कोटींहून अधिक असल्याचा दावा करण्यात येतो.

लक्ष्मी विलास पॅलेस हे गुजरात राज्यातील बडोद्यात स्थित आहे. यावरून आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा राजमहल बडोद्याच्या गायकवाडांचा आहे. हा राजमहल बकिंघम पॅलेसपेक्षा चारपट मोठा मानल्या जातो. या महलाची वास्तूरचना, वास्तू शिल्प येथील बारीक नकशी, येथील सजावट, येथील नक्षीकाम, हा महल तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंची नेहमी चर्चा होते. या महलाचे वैभव आणि डौल हा कायम चर्चेचा विषय आहे.

सयाजीराव महाराजांनी तयार केला राजमहल

हा राजमहल वर्ष 1890 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी तयार केला होता. त्यासाठी त्याकाळी जवळपास 27 लाख रुपये खर्च आला होता. आजच्या काळात ही रक्कम कित्येक कोटी होईल. आज राजमहलात गायकवाड घराण्याचे वंशज समरजीत सिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड आणि त्यांच्या दोन मुली राहतात. हा राजमहल ब्रिटिश वास्तू विशारद मेजर चार्ल्स मॅन्टन यांनी तयार केला होता. त्यांनी या पॅलेससाठी भारतीय आणि युरोपियन शैलीचा अनोखा मिलाफ घडवला.

या पॅलेसमध्ये 170 खोल्या आहेत. या राजमहलात मोती बाग महल, महाराजा फतेहसिंह संग्राहालय, एक छोटेसे प्राणी संग्राहालय आहे. ते पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात. या पॅलेसमध्ये एक क्रिकेट मैदान,स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गोल्फ कोर्स आणि मनोरंजनासाठी इतर सुविधा आहेत. राधिकाराजे गायकवाड यांना बडोद्याची महाराणी म्हटल्या जाते. तर समरजीतसिंह गायकवाड हे रणजी ट्रॉफी खेळाडू होते.