‘मैं नार्को टेस्ट करवाने को तैयार’; …मात्र ब्रिजभूषण सिंह यांनी ठेवली ही पैलवानांसमोर अट

| Updated on: May 21, 2023 | 11:31 PM

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर 1 अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्याच्या अटकेची मागणीही आंदोलकांकडून सातत्याने होत आहे.

‘मैं नार्को टेस्ट करवाने को तैयार’; ...मात्र ब्रिजभूषण सिंह यांनी ठेवली ही पैलवानांसमोर अट
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये त्यांच्या विरोधात धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायतीची बैठकही आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने खाप नेते उपस्थित राहिले होते. तिथे खापच्या लोकांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप खासदाराचे वक्तव्य समोर आले आहे. आपण नार्को टेस्ट करून घेण्यास तयार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे, मात्र त्याने पैलवानांसमोर एक अटही ठेवली आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, ‘मी माझी नार्को टेस्ट, पॉलीग्राफी टेस्ट किंवा लाय डिटेक्टर करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे.

माझ्यासोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनीही ही चाचणी करावी. जर दोन्ही पैलवान त्यांची चाचणी घेण्यास तयार असतील तर त्यापद्धतीची तुम्ही घोषणा करा असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

मी या टेस्ट करुन घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी वचन दिले आहे. मी आजही माझ्या शब्दावर ठाम आहे आणि देशवासियांना सदैव ठाम राहण्याचे वचन देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या आंदोलनातील कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेतेही रविवारी खापमध्ये दाखल झाले होते. ब्रिजभूषण सिंग यांची नार्को टेस्ट करून त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, अशी मागणी करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

तर 23 मे रोजी सायंकाळी 5 वाजता इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात येणार आहे. यावेळीहे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले आहे.

याशिवाय 28 मे रोजी नवीन संसद भवनासमोर महिला महापंचायतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर 1 अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्याच्या अटकेची मागणीही आंदोलकांकडून सातत्याने होत आहे.

त्याचवेळी, पोलिसांनी सिंग यांच्याविरुद्ध दोन एफआयआर आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही नोंद केला आहे. तर आपल्या मागण्या मान्य न झाल्यास 21 मे नंतर मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा पैलवानांनी दिला आहे.