यूपीत 300 प्लसच्या नाऱ्यासह उतरणार भाजपा, सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न, एका फोटोची खास चर्चा

| Updated on: Jun 23, 2021 | 11:50 AM

Yogi Adityanath | उत्तर प्रदेशच्य आगामी निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा कोण असेल? ह्या एका प्रश्नावरून भाजपात वाद सुरु झाला. योगी आदित्यनाथ यांना पक्षातल्याच एका गटानं विरोध सुरु केला.

यूपीत 300 प्लसच्या नाऱ्यासह उतरणार भाजपा, सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न, एका फोटोची खास चर्चा
योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य
Follow us on

लखनऊ: गेल्या काही काळापासून उत्तर प्रदेश दोन कारणांसाठी चर्चेत आहे. एक कोरोना काळात गंगेच्या पाण्यातून वाहत गेलेले मृतदेह आणि दुसरं भाजपातला अंतर्गत कलह. या दोन्हीमुळे भाजपच्या (BJP) देशभरातल्या प्रतिमेला धक्का बसलाय, त्यातून सावरण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेश विधानसभेसाठी 300 जागांचं लक्ष्य निश्चित केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या घरी गेले. त्यातून भाजपच्या अंतर्गतही सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. (UP Election Yogi Adityanath and keshav prasad Maurya meeting picture)

योगी आदित्यनाथ यांना विरोध

उत्तर प्रदेशच्य आगामी निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा कोण असेल? ह्या एका प्रश्नावरून भाजपात वाद सुरु झाला. योगी आदित्यनाथ यांना पक्षातल्याच एका गटानं विरोध सुरु केला. त्यात उपमुख्ममंत्री असलेले केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, पार्टी नेतृत्व ते निश्चित करेन. त्यांचं वक्तव्य थंडावत नाही तेच स्वामी प्रसाद मौर्य यांनीही तिच भूमिका मांडली. त्यातून योगींच्या चेहऱ्याला विरोध असल्याचं दिसून आलं. कोरोना काळात गंगेतून मृतदेह वाहून जात असल्याचं जगानं पाहिलं. त्यातून भाजपची प्रतिमा मलिन झाली. त्याचाच फायदा योगींच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उचलण्याचा प्रयत्न केला.

बदलांसाठी दिल्ली वाऱ्या

उत्तर प्रदेश भाजपात सर्व काही आलबेल नसल्याचं दिसताच काही बदल करता येतो का यासाठीही पार्टी नेतृत्वानं प्रयत्न केले. त्यात मग उत्तर प्रदेशचं विभाजन करुन पूर्वांचलची निर्मिती असो की, पीएमओतल्या मोदींच्या विश्वासातल्या एका अधिकाऱ्याला रिटायरमेंटनंतर मंत्री बनवण्याचा प्लॅन असो. योगी आदित्यनाथ दिल्लीत आधी अमित शाहांना भेटले, नंतर मोदींना. ह्या सगळ्या बैठकांमध्ये योगी हे स्वत:च्या भूमिकेवर अडून बसले. अशी चर्चा आहे की, मोदींनी सुचवलेला मंत्रिमंडळ विस्तार, त्यात मोदींच्या खास माणसाची लागणारी वर्णी योगी आदित्यनाथ यांनी धुडकावली. शेवटी दिल्ली ते लखनौ भाजपा नेते, संघ नेते, आमदार, पक्ष संघटनेतले पदाधिकारी यांच्यात बैठकांचं सत्र सुरु झालं.

शेवटी योगीच!

कुणाचा कितीही विरोध असो पण उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हाच पक्षाचा सर्वात मोठा चेहरा आहे हे मोदी-शाहांनाही कबुल असल्याचं दिसून आलं आहे. एवढच काय ह्या दोन नेत्यानंतर देशातलं पक्षाचं तिसऱ्या नंबरचा चेहरा म्हणूनही योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे पक्षांतर्गत वाद फार न ताणता सर्व नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे. राजनाथसिंह यांनीही योगी आदित्यनाथ हेच चेहरा असतील अशी घोषणाही केली आहे. त्यानंतर काल योगी आदित्यनाथ हे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नवविवाहित मुलाला आशीर्वाद देण्यासाठी मौर्यंच्या घरी गेले. तिथंच संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेही होते. दुसरे उपमुख्ममंत्री दिनेश शर्माही हजर होते. या फोटोत पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

संबंधित बातम्या:

जबरदस्ती धर्मांतर केल्यास रासुका लागणार, संपत्तीही जप्त होणार; योगी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

(UP Election Yogi Adityanath and keshav prasad Maurya meeting picture)