सभेत भाषण करत असतानाच आई गेल्याची बातमी आली… मुख्यमंत्री योगी यांच्यावर दु:खाचा डोंगर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे 91 व्या वर्षी निधन झाले आहे. गोरखपूरमधील सभेला संबोधित करत असतानाच त्यांना ही दुःखद बातमी मिळाली. वडिलांच्या अंत्यसंस्काराला कोविडमुळे उपस्थित राहू न शकलेले योगी, आईच्या निधनानंतर पौडीला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. त्यांनी नुकतीच आईची भेट घेतली होती.

सभेत भाषण करत असतानाच आई गेल्याची बातमी आली... मुख्यमंत्री योगी यांच्यावर दु:खाचा डोंगर
Yogi Adityanath
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 12:58 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. योगींची आई सावित्री देवी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. उत्तराखंड येथील पौडी गढवाल जिल्ह्यातील राहत्या घरी सावित्री देवी यांनी अखेरचा श्वास घेतला. पौडीचे एसएसपी सर्वेश कुमार यांनी सावित्री देवींच्या निधनाची पुष्टी केली आहे. सावित्री देवी याा पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात राहत होत्या. याच गावात योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील आनंद सिंह बिष्ट हे वन विभागात कार्यरत होते. 2020 मध्ये वयाच्या 89व्या वर्षी आनंद सिंह बिष्ट यांचं निधन झालं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर येथे एका सभेला संबोधत असतानाच त्यांना आईच्या निधनाची बातमी समजली. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच आदित्यनाथ हे पौडी गढवालला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा कोरोना होता. त्यामुळे कोव्हिड प्रोटोकॉलमुळे योगी आदित्यनाथ वडिलांच्या अंतिम संस्काराला जाऊ शकले नव्हते. उत्तर प्रदेशात कोरोना संकट आहे. लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे वडिलांचं अंत्यदर्शन घेऊ शकत नाही, असं योगी आदित्यनाथ त्यावेळी म्हणाले होते.

Loading...

दरम्यान, सावित्री देवी यांना योगी आदित्यनाथ यांच्यासह चार मुले आणि तीन मुली आहेत. मानेंद्र सिंह, महेंद्र सिंह, शैलेंद्र मोहन आणि पुष्पा देवी, कौशल्या आणि शशि देवी आदी बहीण भावंडांचा यात समावेश आहे.

1994 मध्ये घर सोडलं, संन्यासी बनले

योगी आदित्यनाथ यांचं मूळ नाव अजय सिंह बिष्ट आहे. त्यांचा जन्म 5 जून 1972 मध्ये उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात झाला होता. 1994 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी संसारिक जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गोरखपूर येथील गोरक्षपीठात ते सामील झाले. महंत अवैद्यनाथ यांचे ते शिष्य बनले. संन्यास घेतल्यानंतर आदित्यनाथ यांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी कमी झाल्या. पण आईशी त्यांचा संपर्क होता. मुख्यमंत्री झाल्यावरही ते अधूनमधून आपल्या गावी जाऊन कुटुंबाला भेटायचे.

पाच वर्षानंतर गावी गेले

मे 2022मध्ये योगी आदित्यनाथ सुमारे पाच वर्षानंतर आपल्या गावी पंचूरला गेले होते. यावेळी त्याने आई सावित्री देवी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली होती. गावात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. योगी आपल्या घरी रात्रभर थांबले होते.

आईला भेटण्यासाठी ऋषिकेशला

जून 2024मध्ये योगी आदित्यनाथ आपल्या आईला भेटण्यासाठी ऋषिकेशच्या एम्सला गेले होते. वयोमानानुसार तब्येत बिघडल्याने सावित्री देवींना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आईची भेट घेऊन डॉक्टरांकडूनही प्रकृतीची माहिती घेतली होती. तब्बल 20 मिनिटे ते आईसोबत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us