
उत्तर प्रदेशच्या आगरामधून एक धक्कादयाक घटना समोर आली आहे, एका 30 वर्षीय इंजिनिअरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. रोहित कुमार असं या अभियंत्याचं नाव आहे. पोलिसांना हॉटेलच्या एका रूमध्ये या इंजिनिअरचा मृतदेह आढळून आला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी एक पेन ड्राईव्ह आणि सुसाइड नोट सापडली आहे, या सुसाइड नोटमध्ये रोहितने आपली शेवटची इच्छा सांगितली आहे.
रोहित कुमार हा मेरठचा रहिवासी आहे, ‘माझ्या मृत्यूनंतर 13 दिवसांचं नाटक करू नका, घरातल्या सर्वांना बोलवा मग 13 दिवस सर्व विधी करा, त्यापेक्षा मी जसा गायब झालो आहे, तसंच मला राहू द्या.मी तिचा पहिला रुग्ण आणि ती माझी शेवटची डॉक्टर आहे, माझा मृतदेह माझ्या घरच्यांना किंवा नातेवाईकांना देऊ नका. माझे अवयव दान करा किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाठी द्या, मी गायब होऊ शकतो, पण माझं शरीर कधीच नष्ट होणार नाही, असं रोहितने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान रोहितच्या मृददेहाशेजारी पोलिसांना एक पेन ड्राईव्ह देखील सापडला आहे, ज्यामध्ये त्याची ही सुसाईड नोट पीडीएफ फॉरमॅटमध्ये होती, ज्यामध्ये एका महिला डॉक्टरचं नाव आणि नंबर देखील लिहिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या ही डॉक्टर महिला दुसऱ्या कोणत्यातरी जिल्ह्यात कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार शाहगंज परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये एक तरुण त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला, रोहित असं या तरुणाचं नाव आहे. रोहितला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याचा भाऊ प्रोपेसर असून तो आपल्या पत्नीसह विदेशात सेटल झाला आहे, तर दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहेत. रोहितला गेल्या अनेक दिवसांपासून चांगली नोकरी मिळत नव्हती, त्यामुळे तो तणावात होता, यातूनच त्याने हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र त्याने सुसाईड नोटमध्ये डॉक्टर महिलेचं नाव का लिहिलं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, घटनेबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.