रुळांवरुन धावणारे ‘फाईव्ह स्टार हॉटेल’, वंदेभारत स्लिपर ट्रेनचा परदेशी तरुणीने केला video viral

वंदेभारत स्लिपर ट्रेनच्या चाचण्या आता पुणे ते बंगलुरु मार्गावर सुरु होणार आहेत. या ट्रेनच्या आरामदायी वैशिष्ट्यांची प्रशंसा एका परदेशी तरुणीने केली असून त्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

रुळांवरुन धावणारे फाईव्ह स्टार हॉटेल, वंदेभारत स्लिपर ट्रेनचा परदेशी तरुणीने केला video viral
vande bharat sleeper pic
| Updated on: Aug 16, 2026 | 3:32 PM

देशातील रेल्वे प्रवासाचे स्वरुप बदलून टाकणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढत आहे. आता देशभरात १०० हून अधिक वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत. या वंदेभारत भारत सेमी हायस्पीड ट्रेन असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासा सोबतच आता वेगवान प्रवासाची अनुभूती मिळत आहे.या वंदेभारत एक्सप्रेस या चेअर कार ट्रेन असल्याने लांबच्या आणि रात्रीच्या प्रवासासाठी वंदेभारत स्लिपर ट्रेनचे आगमन झाले आहे. आता महाराष्ट्रात वंदेभारत स्लिपर ट्रेन पुणे ते बंगळुरु या मार्गावर चालवण्याची रेल्वेची योजना आहे. या वंदेभारत स्लिपर ट्रेनचा एक व्हिडीओ परदेशी तरुणीने व्हायरल केला आहे. या तरुणीने या ट्रेनला रुळांवरुन धावणारे ‘फाईव्ह स्टार हॉटेल’ असे या वंदेभारत स्लिपर ट्रेनचे कौतूक केले आहे.

वंदेभारत स्लिपर ट्रेन ही अत्यंत आरामदायी आणि खास रात्रीचा प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या आत तुम्ही आरामात झोपून प्रवास करु शकता. देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन हावडा ते कामाख्या (गुवाहाटी) या मार्गावर धावत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जानेवारी २०२६ रोजी या पहिल्या वंदेभारत स्लिपर ट्रेनचे उद्घाटन केले असून, हा मार्ग पश्चिम बंगाल आणि आसामला जोडतो.आता दुसरी वंदेभारत स्लिपर ट्रेन पुणे ते बंगळुरु मार्गावर धावणार असून १२ तासात पुणे ते बंगळुरु अंतर कापता येणार आहे.

‘रुळांवर धावणारे फाईव्ह स्टार हॉटेल

एका परदेशी तरुणीने सोशल मीडियावर वंदेभारत स्लिपर ट्रेनमधील प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात या तरुणीने वंदेभारत स्लिपर ट्रेनला ‘रुळांवर धावणारे फाईव्ह स्टार हॉटेल’ ( Five-Star Hotel on Rails ) अशी तिची स्तुती केली आहे. या ट्रेनचे अत्याधुनिक इंटेरिअर, आरामदायी बर्थ, प्रायव्हसी स्मार्ट डोअर लॉक, टच फ्री सेंसर असणारे स्वच्छ बायो व्हॅक्युम टॉयलेट आणि प्रत्येक सीटजवळ एअर वेंट तसेच रिडींग लाईट्सची स्तुती केली आहे.

वंदे भारत स्लिपर ट्रेनची मुख्य वैशिष्ट्ये

अत्याधुनिक केबिन आणि बर्थ तसेच अत्यंत आकर्षक डिझाईन

प्रायव्हसी आणि सुरक्षा

फर्स्ट एसी कुपे

केबिनसाठी स्वतंत्र एअर सर्क्युलेशन नॉब्स

आधुनिक टच – फ्री फिटींग आणि शॉवर सुविधा सोबत शानदार वॉशरुमची सुविधा

युएसबी-सी टाईप चार्जिंग पोर्ट्स, लाईट्स

येथे पोस्ट पाहा…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us