मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटनंतर बाबरी मशिदीवरुन सेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपली; राणे, चंद्रकांत पाटलांचे शाब्दिक फटकारे

| Updated on: Dec 06, 2021 | 11:17 PM

ज्याठिकाणी बाबरी मशिद होती. तिथं सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर, आता राम मंदिराचं काम सुरु आहे. मात्र बाबरी मशिदीवरुन कायम भाजप-सेनेत जुंपल्याचंही पाहायला मिळालंय. नार्वेकरांच्या ट्विटनंतरही त्याची पुन्हा एकदा झलक दिसली.

मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटनंतर बाबरी मशिदीवरुन सेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपली; राणे, चंद्रकांत पाटलांचे शाब्दिक फटकारे
मिलिंद नार्वेकर
Follow us on

मुंबई : अयोध्येतील बाबरी मशिद 6 डिसेंबर 1992 रोजी पाडण्यात आली होती. बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला आज 29 वर्षे पूर्ण झाली. आज 6 डिसेंबरचंच औचित्य साधून, शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांनी बाबरी मशिदसंदर्भात एक ट्विट केलं. आणि त्यानंतर राणेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनाच डिवचलं. नार्वेकरांचे ट्विट योग्यच असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. तर नारायण राणे, चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला शाब्दिक फटकारे मारले आहेत.

ज्याठिकाणी बाबरी मशिद होती. तिथं सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर, आता राम मंदिराचं काम सुरु आहे. मात्र बाबरी मशिदीवरुन कायम भाजप-सेनेत जुंपल्याचंही पाहायला मिळालंय. नार्वेकरांच्या ट्विटनंतरही त्याची पुन्हा एकदा झलक दिसली. बाबरी मशिदीवरुन उद्धव ठाकरेही भाजपला कायम टोले लगावत असतात. विधानसभेतही उद्धव ठाकरे भाजपला डिवचण्याची संधी सोडत नाहीत.

नारायण राणेंचा खोचक सवाल

मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटबाबत पत्रकारांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. यावेळी फडणवीसांनी नार्वेकरांच्या ट्विटला योग्यच म्हटलं. मात्र बाजूलाच उभे असलेल्या नारायण राणेंनी फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर तात्काळ सवाल केला. मिलिंद नार्वेकर नवे शिवसेनाप्रमुख आहेत का ? असा खोचक सवाल नारायण राणेंनी केला.

काही गोष्टी विसरायला हव्यात : राऊत

काही गोष्टी विसरायला हव्यात, अध्याय संपला आहे. राम मंदिर उभं राहतंय. देश एक रहावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज आंबेडकरांचं स्मरण केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

नार्वेकरांचं ट्विट महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणार

मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटचा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही समाचार घेतला आहे. नार्वेकरांचं ट्विट हे, महाविकास आघाडीच्याच पायाला सुरुंग लावणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. राणेनंतर, चंद्रकांत पाटलांनीही मिलिंद नार्वेकरांना शाब्दिक फटकारे मारलेत. (After Milind Narvekar’s tweet, Sena-BJP clash again from Babri Masjid)

इतर बातम्या

शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार ? संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना भेटणार !

Omicron Update | राज्यावर ओमिक्रॉनचे संकट, लसीकरण किती परिणामकारक, वाचा सविस्तर