Omicron Update | राज्यावर ओमिक्रॉनचे संकट, लसीकरण किती परिणामकारक, वाचा सविस्तर

प्रकृती व्यवस्थित असण्यावर जोर देण्याचं कारण म्हणजे 21 रुग्णांपैकी दोन ते तीन जण ज्येष्ठ नागरिक आहेत. मात्र साधा सर्दी-खोकला सोडला, तर इतर मोठी लक्षणं कुणालाही नाहीत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे मृत्यूदर वाढणार का ? यावर सर्वाधिक चर्चा होतेय.

Omicron Update | राज्यावर ओमिक्रॉनचे संकट, लसीकरण किती परिणामकारक, वाचा सविस्तर
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : एकाच दिवसात 17 ओमिक्रॉन रुग्ण वाढल्यानंतर देशातला आकडा 20 च्या पुढे गेलाय. दुपारपर्यंत दिल्लीत एक, गुजरातमध्ये 1, कर्नाटकात 2, राजस्थानात 9 आणि महाराष्ट्रातही 9 ओमिक्रॉन रुग्णांची पुष्टी झाली आहे. यात सर्वाधिक दिलाशाची बाब म्हणजे अद्याप या सर्व रुग्णांची प्रकृती व्यवस्थित आहे. प्रकृती व्यवस्थित असण्यावर जोर देण्याचं कारण म्हणजे 21 रुग्णांपैकी दोन ते तीन जण ज्येष्ठ नागरिक आहेत. मात्र साधा सर्दी-खोकला सोडला, तर इतर मोठी लक्षणं कुणालाही नाहीत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे मृत्यूदर वाढणार का ? यावर सर्वाधिक चर्चा होतेय.

दक्षिण आफ्रिकेत रोजचे सरासरी 100 मृत्यू

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनमुळे रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. येथे रोज 10 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद केली जात आहे. रशियात डेल्टा प्लस व्हेरिएंटचाच फैलाव वेगानं होतोय. इथं रोज 33 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. मात्र ओमिक्रॉनबाधित दक्षिण आफ्रिकेत रोजचे सरासरी मृत्यू हे शंभरच्या आत आहेत. डेल्टा बाधित रशियात रोज सरासरी मृत्यू 1200 हून अधिक होतायत.

ऑगस्टपर्यंत डेल्टामुळे महाराष्ट्रात 66 लोक बाधित 

याआधी जूनच्या दरम्यान भारतात डेल्टा प्लस व्हेरियंटचा शिरकाव झाला होता. डेल्टा प्लसबाबत ओमिक्रॉनसारखी भीती होती. मात्र डेल्टा प्लसमुळे मृत्युदर वाढण्याचाही अंदाज होता. ऑगस्टपर्यंत डेल्टामुळे महाराष्ट्रात 66 लोक बाधित झाले आणि त्यापैकी 5 लोकांचा मृत्यू झाला. मात्र यातले अनेक लोक आधीच काही व्याधींनी ग्रस्त होते.

भारतात 100 कोटींहून जास्त लोकांना लसीचा किमान एक डोस मिळाला

आता जर ओमिक्रॉनची माहिती बघितली, तर हा व्हेरियंट 23 नोव्हेंबरला अधिकृतपणे घोषित झाला. ओमिक्रॉनचा फैलाव होऊन 14 दिवस झाले आहेत. मात्र जगात अद्याप ओमिक्रॉनमुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. दुसरा भाग म्हणजे जेव्हा भारतात डेल्टा प्लसचा फैलाव होता, तेव्हा भारतात 10 टक्केदेखील लसीकरण झालेलं नव्हतं. सध्या भारतात 100 कोटींहून जास्त लोकांना लसीचा किमान एक डोस मिळालाय.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनची स्थिती काय ?

पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 6 ओमिक्रॉन बाधित आहेत. त्यापैकी एकाला सौम्य लक्षणं आहेत. तर बाकी पाचही जणांमध्ये एकही लक्षण नाही. 6 रुग्णांपैकी 3 जण नायजेरियातून भारतात आले. भारतात त्यांचा इतर 3 जणांशी संपर्क आला. 6 पैकी 3 रुग्ण 18 वर्षांहून लहान आहेत. त्यामुळे त्यांना लस मिळालेली नाही. उर्वरित तिन्ही जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या 6 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 13 लोकांच्या चाचण्या झाल्या. त्यापैकी 10 निगेटिव्ह तर 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 3 जणांना कोणता कोरोना झालाय, याचा रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहे.

तूर्तास ओमिक्रॉनबाबत प्रत्येक तज्ज्ञ वेगवेगळे दावे करत असला, तरी लसीकरणामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे व्हेरियंट जरी बदलला, तरी लसच ओमिक्रॉनविरोधात बचावाची ढाल असणार आहे.

इतर बातम्या :

Mumbai : समीर वानखेडेंविरोधात चैत्यभूमिवर घोषणाबाजी, मलिकांकडूनही वानखेडेंना पु्न्हा चिमटा

राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या सोयीचं राजकारण; विद्वान जे बोलू शकत नाही, ते पहेलवान शड्डू ठोकून बोलू शकतो!

पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI