AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार ? संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना भेटणार !

संजय राऊत राहुल गांधी आणि प्रिंयका गांधींची 2 दिवसांत भेट घेणार आहेत. ही भेट संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएवरुन होणार असल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी शिवसेना अजून तरी काँग्रेस प्रणित यूपीएमध्ये नाही.

शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार ? संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना भेटणार !
संजय राऊत, राहुल गांधी
| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 06, 2021 | 10:43 PM
Share

मुंबई : काँग्रेसला बाजूला ठेवून, कोणतीही आघाडी होऊ शकत नाही असं पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मुंबईहून पश्चिम बंगालला परतताच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बोलले होते. त्यानंतर आता संजय राऊत राहुल गांधी आणि प्रिंयका गांधींची 2 दिवसांत भेट घेणार आहेत. ही भेट संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Front) अर्थात यूपीएवरुन होणार असल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी शिवसेना अजून तरी काँग्रेस प्रणित यूपीएमध्ये नाही. त्यामुळं सुरुवातीच्या चर्चेसाठी राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना भेटणार असल्याचं कळतंय.

ममतांचा काँग्रेसवर निशाणा, पवार, राऊतांची सारवासारव

2024 मध्ये मोदींविरोधात भक्कम आघाडी करण्याच्या उद्देशानं ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच 1 तास चर्चाही झाली. मात्र ममतांच्या टीकेवरुन हे लक्षात येतंय, की त्यांना काँग्रेसलाच दूर ठेवायचं आहे. पण महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पाहता, हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मान्य नाही. यूपीएलाच मजबूत करण्यावर पवारांसह शिवसेनेचाही भर असल्याचं दिसून येत आहे.

यूपीएमध्ये सध्या 19 पक्ष

यूपीएत सध्या 19 पार्टी आहेत. ज्यात काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, इंडियन यूनियन मुस्लिम लीग, एमडीएमके, आरएसपी, गोवा फॉरवर्ड पार्टी, या सारख्या पक्षांचा समावेश आहे. असं असलं तरी 19 पक्षांच्या यूपीएची ताकद मोदींच्या तुलनेत कमीच आहे. कारण,

>> एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या 352 आहे >> त्यात भाजपचेच 303 खासदार आहेत >> तर यूपीएचे 90 खासदार आहेत. ज्यात काँग्रेसच्या खासदारांची संख्या 52 आहे.

शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होऊन भाजपला टक्कर देणार?

शिवसेनेचा मार्ग हा आता वेगळा झालाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे राजकीय मित्र झाले आहेत. उद्धव ठाकरेंची सध्या भूमिका पाहता, हे आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत जातील असं सध्या दिसत नाही. त्यामुळं शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होऊन भाजपला टक्कर देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या : 

Omicron Variant : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 10 रुग्ण! टास्क फोर्सची बैठक सुरु, निर्बंध लागणार?

राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या सोयीचं राजकारण; विद्वान जे बोलू शकत नाही, ते पहेलवान शड्डू ठोकून बोलू शकतो!

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...