…आणि काशिनाथ घाणेकर! उत्तम कलाकृतीचं खणखणीत नाणं

मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे रंगमंचावरील पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेला …आणि डॉ काशिनाथ घाणेकर हा चित्रपट मराठी मनामध्ये दीर्घकाळ घरुन राहणार हे नक्की. दर्जेदार चित्रपट, अप्रतिम कलाकृती आणि उत्कृष्ट अभिनय या तिहेरी कसोटीवर सरस ठरलेला हा सिनेमा मराठी चित्रपटाच्या इतिहासात एकदम कडक झालेला आहे. ऐतिहासिक अभिनयासाठी परिचित असेलेला […]

...आणि काशिनाथ घाणेकर! उत्तम कलाकृतीचं खणखणीत नाणं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे रंगमंचावरील पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेला …आणि डॉ काशिनाथ घाणेकर हा चित्रपट मराठी मनामध्ये दीर्घकाळ घरुन राहणार हे नक्की. दर्जेदार चित्रपट, अप्रतिम कलाकृती आणि उत्कृष्ट अभिनय या तिहेरी कसोटीवर सरस ठरलेला हा सिनेमा मराठी चित्रपटाच्या इतिहासात एकदम कडक झालेला आहे. ऐतिहासिक अभिनयासाठी परिचित असेलेला अभिनेता सुबोध भावे यांनी साकारलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेला तोड नाही.

मराठी रंगभूमीवरचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालून जातो. प्रभाकर पणशीकर असो वा प्रा. वसंत कानेटकर यांच्या भूमिकेला न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद इंगळे यांनी केलं आहे. उत्तम नट म्हणून रंगमंचावर वावरणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या खाजगी आयुष्यातील संघर्षावर हा सिनेमा भाष्य करतो. एखाद्या कलाकृतीला मिळणारी दाद कलाकाराला कुठं घेऊन जाते. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्यांसाठी एक कलाकार आपल्या अभियनात किती गुरफटत जातो. व्यसनाधीन होऊन कशारीतीने आपल्या खाजगी आणि अभिनयाच्या दुनियेत संघर्ष करत असतो हे पाहण्यासाठी नक्कीच हा सिनेमा बघायला हवा.

यशाच्या शिखरावर पोहचलेला नट, त्याच्या एन्ट्रीला पडणाऱ्या टाळ्या-शिट्ट्या, कोणतीही भूमिका केली तरी त्याचेच पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं ठरणार हे नक्की. अगदी चित्रपटाच्या भाषेत सांगायला गेलं तर आपलं नाणं कसं खणखणीत वाजतंय, एकदम कडकककक…..

चिटपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना भावणारं सुबोध भावे यांचा अभिनय तसेच खणखणीत नाणं वाजल्यासारखं आहे. 1970-80 चं दशक गाजवणारा, मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता डॉ. काशिनाथ घाणेकर हे खरंतर आजच्या पिढीला कळणं गरजेचं होतं, ते पोहचवण्याचं काम उत्कृष्टरित्या सुबोध भावे आणि या सिनेमातील कलाकारांनी केलं आहे. अश्रूंची झाली फुले मधला लाल्या, आनंदी गोपाळ, गारंबीचा बापू तसेच रायगडाला जेव्हा जाग येते यातील संभाजी प्रत्येक भूमिका हुबेहूब आहे तसं साकारून सुबोध भावेंनी सुद्धा प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

गेल्या काही वर्षात मराठी सिनेमा हाऊसफुल्ल होतायेत, मराठी प्रेक्षक सहकुटुंब थिएटरकडे वळतोय, मराठी चित्रपट कात टाकतोय हे सगळं घडतंय ते आपल्या मराठी कलाकारांमुळे. दर्जेदार कथानकाला चांगल्या अभिनयाची जोड दिली तर हिंदीलाही मागे टाकून मराठी सिनेमा सरस उभा राहू शकतो, इतकंच नाही तर व्यावसायिक भाषेत खऱ्या अर्थाने प्रॉफिट मिळवून देऊ शकतो, हे या सिनेमावरुन कळतंय.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान यांच्या ठग्स ऑफ हिंदोस्तान यासारख्या बिग बजेट सिनेमालाही मराठी सिनेमा टक्कर देऊ शकतो हे मराठीतला पहिला आणि शेवटचा सुपरस्टार साकारणाऱ्या सुबोध भावेंनी दाखवून दिलं आहे.

प्रविण मरगळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई 

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.