AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंद अभ्यंकर ते विनायक मेटे! 10 वर्षांनंतरही अपघात सत्र सुरुच, मुंबई पुणे महामार्गाबाबत उत्तर न मिळालेले 3 प्रश्न

Mumbai Pune Express Highway : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगमर्यादेचं उल्लंघन सर्रास करणाऱ्यावर कारवाई कितपत होते, असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतो.

आनंद अभ्यंकर ते विनायक मेटे! 10 वर्षांनंतरही अपघात सत्र सुरुच, मुंबई पुणे महामार्गाबाबत उत्तर न मिळालेले 3 प्रश्न
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळाImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Aug 14, 2022 | 12:26 PM
Share

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे (Mumbai Pune Express Highway) हा तसा विकासाला चालना देणारा हायवे म्हणून तर पाहिला जातोच. या महामार्गामुळे मुंबई-पुणे अंतर अगदी जवळ आलं. पण हे अंतर जवळ येत असताना या महामार्गवर झालेल्या अपघातांची संख्याही काळजी करायला लावणारी आहे. सर्वसामान्य माणसांचा जीवही या महामार्गावर गेला आणि काही सेलिब्रिटीनीवरही या महामार्गावर झालेल्या अपघातांनी घाला घातला आहे. रविवारी सकाळी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Accident News) यांच्या अपघाती मृत्यूमुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेबाबतच तीन गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हेच प्रश्न तीन 10 वर्षांपूर्वीही उपस्थित करण्यात आले होते. अभिनेते आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar Accident News) यांचा 2012 साली मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला होता. याच अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. आता दहा वर्षांनी पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला आहे. यावेळी विनायक मेटे यांचं या अपघातामध्ये निधन झालंय. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी उपस्थित करण्यात आलेले सवाल आता पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

सवाल क्रमांक 1 : टोल अफाट आणि पोलिसांचं वचक?

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे म्हटला की काहींना तो रेसिंग ट्रॅक असल्यासारखाच वाटतो. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर एकतरी गाडी वाऱ्याच्या वेगाने सुस्साट जाताना दिसून आली नाही, असं होत नाही. मात्र वाऱ्याच्या वेगासोबत खेळ करणाऱ्या या जीवघेण्या वेगावर पोलिसांचा वचक किती आहे, असाही सवाल उपस्थित होतो. प्रचंड वेगाने अपघात घडून अनेक निष्पापांना जीव गमवावा लागल्याच्या घटना फक्त मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरच घडल्या आहेत असं नाही. पण मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगमर्यादेचं उल्लंघन सर्रास करणाऱ्यावर कारवाई कितपत होते, असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतो. वेगमर्यादा पाळजी जात नसेल, तर याचा अर्थ पोलिसांचा धाक मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन गाड्या हाकणाऱ्यांना आहे की नाही, अशी शंका घेतली जाते. तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांत मुंबई पुणे एक्क्स्प्रेस हायवेवरचा टोलही महागला आहे. अफाट टोल देऊनही सुरक्षिततेचा प्रश्न मात्र राम भरोसे आहे, अशीही भावना अनेकजण व्यक्त करतात.

सवाल क्रमांक 2 : लेनमधल्या चरींचं काय?

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अजूनही काही भागात काम सुरु आहे. दुरुस्ती देखभालीच्या कामासाठी डायव्हर्जन केलेलं असो किंवा मग मुंबईहून पुण्याला जात असताना खालापूर सोडल्यानंतर रुंदीकरणाऱ्या कामानिमित्त केलेला वाहतुकीतील बदल असेल, मुंबई पुणे महामार्गावरुन गाडी चालवणं अधिकच जिकरीचं झालं. त्यात लेनमधल्या चरींमुळे देखील मुंबई पुणे महामार्गावरावर शंका उपस्थित केले जाऊ लागले.

सवाल क्रमांक 3 : रुग्णालय, रुग्णवाहिका कुठे आहेत?

मुंबई पुणे महामार्गावर अपघात झालाच तर अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी थेट मुंबई किंवा पिंपरी पुण्याशिवाय मध्ये कोणताच पर्याय नाही. लोणावळ्यातही रुग्णालय आहे. पण अनेकदा गंभीर रुग्णांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात आणलं जातं. अशावेळी रुग्णाला वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्यानं रुग्णां जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. रुग्णवाहिकेचा प्रश्न, रुग्णालयं, हा मूलभूत समस्या आजही मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर आहेच. या तीन प्रश्नांना 10 वर्षांत कोणतंही उत्तर मिळू शकलेलं नाही.

Follow Us
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न